गेवराई (रिपोर्टर): ऑटोरिक्षाद्वारे देशीदारू घेऊन जात असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला झाल्यानंतर तलवाडा पोलिसांनी अर्धमसला फाट्यावर ऑटोरिक्षा पकडून त्यातील 144 बाटल्या जप्त केल्या. या बाटल्यांची किंमत 10 हजार 80 रुपये इतकी आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्धमसला फाट्यावरून एका रिक्षात अवैधरित्या देशी दारूच्या बाटल्या घेऊन जात असल्याची माहिती तलवाडा पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी रिक्षा पकडून त्यातील तीन बॉक्स 144 बाटल्या जप्त केल्या. या बाटल्यांची किंमत 10 हजार 80 इतकी अहे. या प्रकरणी शिवनाथ गंगाधर परळकरयाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. शिंदे, विठ्ठल चव्हाण, पवन शेळके यांनी केली आहे.