बीड (रिपोर्टर)- ओबीसींच्या आरक्षणात इतर जातींचा समावेश करू नये यासह इतर मागण्यांसाठी आज ओबीसींच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून निघाला होता. टी.पी. मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता. मोर्चामध्ये हजारो समाज बांधव सहभागी झाले होते.
ओबीसींच्या आरक्षणात इतर जातींचा समावेश करू नये, जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहांची सोय करावी, ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षिणक शिष्यवृत्तीत वाढ करावी, ओबीसी महामंडळाच्या निधीत वाढ करावी, यासह इतर मागण्यांसाठी आज टी.पी. मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून निघाला होता. या वेळी आपल्या मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकार्यांना दिले.