माजलगाव (रिपोर्टर)- महाराष्ट्र शासनाने 6 सप्टेंबर 2023 रोजी सरकारी नोकर्यांचे कंत्राटीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने, नोकरी करु पाहणार्या युवकांचे स्वप्न धुळीस मिळत आहे. खाजगीकरण व कंत्राटीकरणामुळे नौकर्यामधील सामाजिक सुरक्षा, आरक्षण, वेतन, भविष्य निर्वाह निधी याबाबी संपुष्टात येतील सुरक्षित कायमस्वरुपी रोजगार संपेल. सुशिक्षित बेरोजगारांना त्यांच्या हक्काच्या सरकारी नोकरीस मुकावे लागेल. तसेच महाराष्ट्रातील 62 हजार शासकीय शाळा, दत्तक शाळा योजनेच्या नावाखाली कंत्राटदाराच्या घशात घालून, सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेचे खाजगीकरण करण्याचा निर्णय 18 सप्टेंबर रोजी सरकारने घेतला आहे. हा निर्णय सुद्धा अत्यंत चुकीचा आहे. यामुळे या दोन्ही जीआर ची होळी डीवायएफआय या युवक संघटनेच्या वतीने माजलगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मध्ये करण्यात आली.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष मोहन जाधव, एड. सय्यद याकूब, विनायक चव्हाण, सुहास झोडगे,
सय्यद फारुख, रुपेश चव्हाण, बालाजी कुंडकर, विजय राठोड सह विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यांनी आंदोलनास पाठिंबा दिला.