सीईओ यांनी केली तडकाफडकी कारवाई
बीड (रिपोर्टर)- जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासनातील काही गुपीत माहिती लिपिकाने सोशल मिडियावर टाकली होती. सदरील प्रकार सीईओ यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत ठोस भूमिका घेत लिपिकाला निलंबीत केले आहे.
जिल्हा परिषद विभागातील काही गुपीत माहिती असते, सदरील ही माहिती सार्वजनिक होऊ नये याची काळजी प्रशासन विभाग घेत असतं. सामान्य प्रशासनातील गुपीत माहिती लिपीक मोहिते यांनी सोशल मिडियावर टाकली होती. हा प्रकार सीईओ यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याची गंभीर दखल घेत लिपीक मोहिते यांना तात्काळ निलंबीत केले आहे.