वडवणी (रिपोर्टर):- भिक नको, संविधानाने दिलेला हक्क द्या असं म्हणत धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण लागू करावे या मागणीसाठी आज वडवणी तहसिल कार्यालयावर धनगर समाजाच्या वतीने पंरापरिक व्यावसायिकासह महिला,तरुण रस्त्यावर उतरुन ना भूतो ना भविष्य असा हजारो जनसमुदयाचा विराट मोर्चा धडकला आहे.
धनगड या समाजाचा अर्थ धनगर करुन राज्यकर्त्यांनी धनगर समाजाला अंधारात ठेवून राजकिय पोळी भाजण्याच महापाप केल आहे.भारतीय संविधानात धनगर समाज हा एसटी प्रवर्गात येतो परंतु समाजाला या आरक्षणाचा लाभ न देता इतर लाभ देण्यात येत आहे. यामुळे समाजाची हानी होत आहे. भारतीय संविधानाने दिलेल्या प्रवर्गानुसार आम्हाला आरक्षण देण्यात यावे या एकमेव मागणीसाठी वडवणी तहसिल कार्यालायावर विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील हा मोर्चा सकाळी 11 वा.साळींबा रोडवरील माता अहिल्याबाई होळकर चौकाचे पुजन करुन लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौक मार्ग छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून छत्रपती संभाजी महाराज चौक मार्ग वडवणी तहसिल कार्यालयावर विराट मोर्चा धडकला आहे. यामध्ये यळकोट यळकोट जय मल्हार, आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच, एकच मशिन धनगर आरक्षण, धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळालेच पाहिजे असा घोषणा देण्यात आल्या आहेत.
मेंढ्या घेऊन समाज रस्त्यावर…
मराठा समाजासोबत धनगर समाजाला देखील आरक्षणा बाबत सरकारने झुलवत ठेवले आहे.तर धनगर समाजाचा पारंपारिक व्यवसाय हा मेंढी पाळणे हा आहे. सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आजच्या मोर्चात मेंढ्याना देखील समाज बांधवाने सहभागी केले होते. पारंपारिक वाद्य आणि घोषणाने वडवणी शहर सारांश दणाणून गेले होते.
मादळमोही येथे चक्काजाम धनगर समाजाला एसटी आरक्षण लागू करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. आज गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. या आंदोलनात मोठ्या संख्येने समाज बांधवांचा सहभाग होता.