केज (रिपोर्टर)- बीड जिल्हा दुष्काळगस्त जाहिर करण्यात यावा. कसत असलेल्या गायरान जमिनी नावे करण्याच्या 1990 च्या निर्णयाला 2005 पर्यंत मुद्दतवाढ देण्यात यावी. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाज बांधवांना आरक्षण देण्यात यावे. या मागण्यांसह विविध मागण्यांची पूर्तता करण्यासाठी रिपाइंचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशावरुन युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली केज तहसीलवर मंगळवार (दि.17) ऑक्टोबर रोजी महामोर्चा धडकला.
महामोर्चात पप्पू कागदे म्हणाले की, राज्य सरकारकडून शिक्षणाचे खाजगीकरण व नोकर्यांचे कंत्राटीकरण वेगवेगळे जी.आर. काढून करण्यात येत आहे. खाजगीकरण व कंत्राटीकरण करुन राज्य सरकारकडून सर्व समाज बांधवांच्या मुलांना शिक्षणापासून व नोकर्यापासून वंचित ठेवण्याचे काम करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यात अल्पप्रमाणात पाऊस झाल्यामुळे जिल्हाभर दुष्काळाचे सावट पसरले असून पाणी चारा व रोजगाराचा प्रश्न गंभीर झाला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजत असून मराठा समाज बांधवांना शिक्षणात व नोकरीत आरक्षण देणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. परंतू ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळालेच पाहिजे. ही रिपाइंची सुरुवातीपासून मागणी आहे. सार्वजनिक आरोग्य हा राष्ट्रीय सुरक्षेचा महत्वाचा भाग असून राज्यभरातील गोरगरीब व गरजू नागरिकांना सर्व सोयीयुक्त आरोग्य सेवा देण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. परंतू गोर-गरीबांसाठी असलेल्या (पान 5 वर)
आरोग्य विभागाचे खाजगीकरण करण्याचे काम राज्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. राज्यभरातील 62 हजार जिल्हा परिषद शाळांचे खाजगीकरण व शासकीय नोकर्यांचे कंत्राटीकरण करुन कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय रद्द करण्यासाठी आगामी काळात सर्व समाज बांधवांनी एकत्र येवून लढा उभारणे व आपल्या न्याय व हक्कासाठी संघटीत होणे ही खरी काळाची गरज आहे.
केज शहरातील क्रांतीनगर व रमाई नगर येथील झोपडपट्टी वासीयांना कबाला पावत्या व पी टी आर मिळवून देण्यासाठी रिपाइंच्या माध्यमातून सतत पाठपुरावा करण्यात येत आहे.अंत्यविधीसाठी स्मशानभूमी हा महत्त्वाचा भाग असून केज तालुक्यातील दलित समाज बांधवांना स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याकरिता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपाइंचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे.
केज रिपाइंच्यावतीने केज तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या महामोर्चास राजू जोगदंड, गोवर्धन वाघमरे,उत्तम मस्के,मझर खान, रविंद्र जोगदंड, राहुल सरवदे, भास्कर मस्के,गौतम बचुटे, दिपक कांबळे, निलेश ढोबळे,किसन तांगडे, बापू पवार, दशरथ सोनवणे, लक्ष्मण सिरसट, धोंडीराम सिरसट,संदिपान डोंगरे, अजित सिरसट, मायाताई मिसळे, अनिता वाघमारे, शिला वाघमारे, रेश्माताई जोगदंड, रेखाताई सरवदे, शालुबाई मस्के, प्रभाकर चांदणे, अश्रूबा तुपारे, प्रमोद दासूद, राजेश सोनवणे, अविनाश जोगदंड, भैय्या मस्के,भैय्या साळवे, शाम वीर, चेतन चक्रे, रमेश निशिगंध, विकास आरकडे, मिलिंद भालेराव, भारत हजारे, नवनाथ खाडे, म्हलारी कांबळे, रतन वाघमारे, सतीश शिनगारे, भाऊसाहेब दळवी, अक्षय कोकाटे, विलास जोगदंड, यांच्यासह हजारोच्या संख्येने गायरान धारक महिला, रिपाइं पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होती.