अधिकार्यांचे नाव घेऊन खुलेआम पैशाची मागणी; ,एजंटच्या फसवेगिराचा शेतकरी पुत्राने व्हिडिओ काढला; शेतकर्यांची तहसिलदारकडे तक्रार
वडवी (रिपोर्टर)- वडवणीच्या दुय्यम निबंधक कार्यालयात एंजट नावाचा राक्षस खुलेआम अधिकाऱ्याचे नाव घेऊन शेतकऱ्याकडून जादा पैसाची मागणी करत असल्यामुळे सदरील कार्यालय हे दलाल आणि लुटारुंचा अड्डा बनलं आहे का? असा प्रश्न उपस्थित राहत असुन संबधित शेतकऱ्याने वडवणी तहसिलदार यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. तर कशा पध्दतीने आणि कोणते कारण सांगून पैसाची मागणी केली जाते यांचा व्हिडिओ देखील समोर आला असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत आधिक माहिती अशी कि, वडवणी शहरातील रहिवाशी असणारे शेतकरी माणिक सिताराम राठोड यांना 2 लाख रुपायाच्या कर्जाची आवश्यकता असल्या कारणाने त्यांनी रामलिंग नागरी सहकारी पंतसंस्थेकडून कर्ज घेण्यासाठी त्यांना माँडगेज करुन आणण्यासाठी सांगितले. म्हणून सर्व शेतीचे दस्तावेज घेऊन दुय्यम निबंधक कार्यालयात गहाणखत करण्यासाठी शेतकरी माणिक राठोड हे गेले आसता त्यांना तेथील आँपरेटर कर्मचारी म्हात्रे असणाऱ्यांनी 2 लाख रुपायाचे गहाण खत करण्यासाठी अडीच हजार रुपये लागतील व बाहेर असलेले एंजट अशोक श्रीराम लोळगे यांच्याकडे रक्कम द्या असे सांगितले. व मुलाच्या फोन पे अंकउन्टवरुन लोळगे या एंजटला आँनलाईन रक्कम अदा केली आहे. यानंतर अजून 500 रुपायची मागणी करण्यात आली आणि ती रक्कम आधिकारी मँडमला द्यायची आहे असे सांगितले. तेव्हा शेतकरी मुलाने या कामाचा तपशील मागविला तेव्हा फक्त नोंदणी फी 1000 रु. आणि दस्त हाताळणी फी 300 रु.असे एकुण फक्त 1300 रुपयाचे चलन देण्यात आले यावर स्पष्ट दिसून आल्यानंतर शेतकरी पुत्राने यांची पोलाखोल करत एंजटचा व्हिडिओ देखील काढला हिशोब मागविला असुन यामध्ये मँडमला देखील 500 रु.द्यावे लागतील आणि ते द्यावेच लागेल. ते ठरलेल असत अन्यथा पुढील कामे केली जाणार नाही असे देखील सांगितले आहे. याबबतचे लेखी तक्रार देखील काल तहसिलदार यांच्याकडे करण्यात आली आहे. तर याबाबतचा व्हिडिओ देखील शेतकरी पुत्र यांनी काढून एंजट चक्क आधिकाऱ्यांचे नाव घेऊन आधिकच्या पैसाची मागणी करत असल्याने अश्चार्य व्यक्त केलं जात आहे. तर सदरील एंजट हा आधिकारी यांच्या संगणमताने आहे का ? असेल तर पाठीराखण का ? आणि नसेल तर कार्यवाही होणार का? असा प्रश्न उपस्थित राहत असुन वडवणीचे दुय्यम निबंधक कार्यालय हे दलाल आणि लुटारुंचा अड्डा तर बनला नाही ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
व्हिडिओ मधला असा आहे संवाद
सदरील केलेल्या गहाणखताचा तपशिलचा हिशोब शेतकरी पुत्राने जाब विचारल्या नंतर असे सांगितले कि, मधला खर्च 1200 रु. बीसी 300 रु. चलन काढण्यासाठी 300 रु. आँनलाईन करुन देण्यासाठी 300 रु. आणि एंजटची फीस आमच्या मनावर 500 ते हजार रुपये घेतोत तुझ्याकडून 400 रु.घेतले आहे.मग अजून 500 रु मागतात ते कशाचे तर ते आतमध्ये मँडमला द्यावे लागतात. त्या पैसाचे मँडमला विचारा असे सांगितल्यानंतर शेतकरी पुत्र मँडमला विचारण्यासाठी गेला आसता कोणी म्हणत, त्यांना बोलावा असे सांगून फक्त गप्प राहतात.यानंतर शेतकरीपुत्र आणि एंजट हमरीतुमरी बातचित होते. यावरुन आधिकार आणि एंजटची मिलभित असल्याचे व्हिडिओमधून दिसून येत आहे.