टक्केवारीसाठीच जलजीवने बिले रोखले होते काय?
ज्यांनी दोन टक्के दिले त्यांचे रात्रीतून बिल निघाले
मुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षाने गचुरे धरून स्वत:चे बिले काढले
बीड (रिपोर्टर)- जलजीवन मिशनअंतर्गत झालेल्या कामाचे बिले तात्काळ देण्याच्या सूचना पालकमंत्री तथा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्यानंतर कित्येक दिवसांपासून रखडलेले बिले देण्यास सुरुवात झाली खरी मात्र काम करणार्या गुत्तेदारांकडून बिले काढण्यासाठी सर्रासपणे सीईओ व प्रकल्प संचालक दोन टक्के घेत असल्याची ओरड होत असून हे बिले काढण्यासाठी गुत्तेदारांसह टक्केवारी घेणार्या अधिकार्यांनी रात्रीचा दिवस केल्याचे सांगण्यात येते. आज पहाटेच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षाने एक रुपयाही न देता आपल्या पाच ते सहा कामांची बिले काढून घेतले. मात्र ज्या गुत्तेदारांनी अथवा गरीब सरपंचाने हे काम व्याजाने पैसे घेऊन केले त्यांना मात्र दोन टक्के सीईओंसह प्रकल्प संचालकाच्या घशात घालावे लागले. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वकांक्षी योजना म्हणून ओळखल्या जाणार्या ‘हर घर नल’ उद्देशासाठी जलजीवन मिशनअंतर्गत बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कामे झाली मात्र गेल्या कित्येक महिन्यापासून या कामाचे बिले संबंधित गुत्तेदारांना देण्यात आले नव्हते. सदरची कामे काही ठिकाणी सरपंचांनीही केले आहेत. हे काम करण्यासाठी काहींना व्याजाने पैसे काढावे लागले आहेत. तत्कालीन सीईओ अजित पवार यांच्या कालखंडात अनेकांचे बिले तयार होते मात्र त्यांची बदली झाल्यानंतर बीड जिल्हा परिषदेचा कारभार अविनाश पाठक यांच्याकडे आला आणि त्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून जलजीवन मिशनची बिले रोखले, कामांची पाहणी केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले होते, मात्र या दोन महिन्यांच्या कालखंडात सीईओ यांनी किती कामांना भेटी दिल्या, कुठल्या कामाची पाहणी अथवा चौकशी केली हे ज्ञात नाही, मात्र पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित नळ योजनेचे बिले देण्याचे आदेश दिले त्यानंतर सीईओ आणि प्रकल्प संचालक यांनी काम करणार्या गुत्तेदारांकडून योजनेच्या दोन टक्क्यांचे ठिबक आपल्या पदरात पाडून घेतले. बीड प्रशासनाकडे या योजनेसाठी तब्बल 72 कोटी रुपये पडून होते. ते देण्यास सुरुवात केली खरी, रात्रभर हे बिले काढण्यात येत होते. जे गुत्तेदार दोन टक्के प्रकल्प संचालकांच्या स्वाधीन करत होते, त्यांच्या खात्यावर तात्काळ बिले पडत होती. मग केवळ टक्केवारीसाठीच गुत्तेदारांची बिले रोखली होती काय, असा सवाल उपस्तित होत असतानाच मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षाने एक रुपयाही न देता आपल्या मसल पॉवर आणि राजकीय वजनातून उपस्थितांना