खाजगीकरण आणि कंत्राटीकरणा विरोधात
वडवणी तहसिलावर
विद्यार्थ्याचा विराट मोर्चा
वडवणी (रिपोर्टर):- सरकारी शाळेचे खाजगीकरण आणि नोकरी मधील कंत्राटीकरण या शासनाच्या निर्णयाविरोधात आज वडवणी तहसिल कार्यालयावर विद्यार्थ्यासह कृती समितीचा जन आंदोलनाच्या माध्यमांतून विराट मोर्चा काढला असुन या मोर्चाने वडवणीकरांचे लक्ष वेधून घेतले आहे.तर शिंदे सरकार काय म्हणतंय…गरिबाला शिक्षण नाय म्हणतंय यासह अन्य सरकार विरोधात घोषणा देत आल्या आहेत.तर यामध्ये शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभाग घेतला आहे.
याबाबत आधिक माहिती अशी कि, काही दिवसांपुर्वी राज्य सरकारने सरकारी शाळेचे खाजगीकरण आणि नोकर भरतीमध्ये कंत्राटीकरण करुन शासन निर्णय काढला आहे. यांचे सर्वत्र पडसाद उमटत असून आज वडवणी तहसिलवर शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनीच्या उपस्थितीमध्ये विराट असा जन अक्रोश मोर्चा काढला असून सदरील मोर्चा भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून निघाला असून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्ग वडवणी तहसिल कार्यालयावर मोर्चा धडकला आहे. यामध्ये शिंदे सरकार काय म्हणतंय…गरिबाला शिक्षण नाय म्हणतंय… शिक्षण आमच्या हक्काचं …नाही कुणाच्या बापाचं…शिंदे सरकार होश मे आव…होश मे
आव…यासह अन्य घोषणा यावेळी देण्यात आल्या आहेत. तर वा रे मोदी…दारु स्वस्त …तेल मंहगा असा निदर्शन बोर्ड घेऊन राज्य आणि केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा निषेध करण्यात आला आहे. तर शाळेचे खाजगीकरण आणि नोकर भरतीचे कंत्राटीकरण केलेला शासकिय निर्णय तात्काळ रद्द करावा अन्यथा पुढील काळात यापेक्षा अधिक तिव्रतेनी आंदोलन करु अशा ईशारा यावेळी दिला आहे.तर विद्यार्थी-विद्यार्थिनी शेकडोच्या संख्येच्या उपस्थितीत पहिलाच मोर्चा निघाला असल्याने वडवणीकराचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.या मोर्चाचे निवेदन वडवणी तहसिलदार यांना देण्यात आले असून या मोर्चाचे आयोजन खाजगीकरण आणि कंत्राटीकरण जन आंदोलन कृती समितीने केले होते.