बीड (रिपोर्टर) प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये कार्बनडाय ऑक्साईड वायू हवेमध्ये पसरत असल्यामुळे पृथ्वीचे तापमान दीड टक्क्याने वाढते. पृथ्वीवरील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आणि पावसाचे प्रमाण वाढवण्यासाठी बांबू या झाडाची मोठ्या प्रमाणात मदत होते. जमीनीतील पाण्याचा ओलावा सर्वात जास्त बांबू हे झाड किंवा वनस्पिती टिकवून ठेवते त्यामुळे शेतकर्यांना बांबू लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन द्यावे, असे शेतकरी कृषीमूल्याचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितले.
पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन सभागृहामध्ये बांबू लागवडीसंदर्भात कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती. या वेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. बांबू ही वनस्पती कल्पवृक्ष वनस्पती आहे. बांबुपासून विविध वस्तू तयार होतात. इतकेच काय कपडाही बांबुपासून तयार होतो, कागदही बांबुपासून तयार होतो. काही युरोपियन देशातील शास्त्रज्ञ भारतात येऊन बांबु या वनस्पतीवर मोठ्या प्रमाणावर रिसर्च करत आहेत. बांबु ही वनस्पती सर्वात जास्त जमीनीमध्ये पाण्याचा ओलावा टिकवून ठेवते, हवेतील कार्बनडाय ऑक्साईड शोशून घेते आणि पाणीही कमी लागते. शेतकर्यांना बांबुपासून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होईल त्यामुळे जिल्हा प्रशासनाने इतर फळ झाडांसोबत बांबू लागवडीसाठी जाणीवजागृत करत प्रोत्साहन द्यावे, असेही या वेळी पाशा पटेल यांनी सांगितले. या कार्यशाळेला सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नरेगाचे अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.