सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाबाबतचा निर्णय रद्द करण्याची मागणी
बीड (रिपोर्टर): अनुसूचीत जाती – जमाती आरक्षणात क्रेमिलेअर आणि कोटा लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दलित-आदिवासी संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली होती. या बंदमध्ये बीड शहराने सहभाग घेतला होता. शहरातील व्यापार्यांनी आपआपले व्यवहार बंद ठेवले होते. सकाळी शहरातून दलित-आदिवासी संघटनांनी निषेध रॅली काढली. या रॅलीमध्ये अनेकांचा सहभाग होता. सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान तालुक्याच्या ठिकाणी आजच्या या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.
अनुसूचीत जाती-जमाती आरक्षणात कोटा लागू करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गेल्या काही दिवसांपूर्वी दिलेला आहे. या निर्णयाबाबत दलित-आदिवासी संघटनांनी नाराजी व्यक्त करत हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली असून त्यासाठी आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. आजचा हा बंद नॅशनल कॉन्फेडेरेशन ऑफ दलित आणि ट्रायबल ऑर्गनायझेशन संघटनेने पुकारलेला आहे. या बंदला काही ठिकाणी चांगला तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. बीड येथेही हा बंद पाळण्यात आला. शहरातील व्यापार्यांनीही आपआपले व्यवहार बंद ठेवले होते.द लित आदिवासी संघटनांच्या वतीने शहरातून रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमद्ये अनेकाचां सहभाग होता. तालुक्याच्या ठिकाणी या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून आले आहे.