मुंबई (रिपोर्टर): महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीतर्फे 25 ऑगस्टरोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची तारीख नंतर जाहीर केली जाईल, असे एमपीएससीने म्हटले आहे. गुरुवारी आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची बैठक गुरुवार, दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांकडून दबाव वाढत असल्याने या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता होती. त्याप्रमाणे आयोगाने निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आंदोलक विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलं असं म्हणालं लागेल.












