नितेश राणे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध
माजलगाव, रिपोर्टर : भाजपाचे नितेश राणे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे केलेल्या कृत्याचा व वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो. राणे पिता-पुत्र नेहमीच समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करतात त्यामुळे राणे पिता-पुत्रांना आवर घाला अशी विनंती आपण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगितले.
माजलगाव शहरात पत्रकारांशी पुढे बोलताना आमदार सोळंके म्हणाले की, नुकतेच छत्रपती संभाजीनगर येथे भाजपाचे नितेश राणे हे एका कार्यक्रमानिमित्त आले होते. परंतु या ठिकाणी त्यांनी मुस्लिम समाजाचे धार्मिक स्थळ असलेल्या मशिदिकडे बंदूक दाखवत बेताल वक्तव्य केले.
या वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण होण्याचे काम होते. त्याचबरोबर राणे पिता-पुत्र राज्यभर वायफळ बोलतात यातून समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व तू सुव्यवस्था बिघडण्याचे काम होते. त्यामुळे याप्रकरणी मी नितेश राणे यांनी केलेल्या कृत्याचा व वक्तव्याचा निषेध करतो तसेच
राणे पिता-पुत्रांना आवर घाला अशी विनंती आपण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान अतिवृष्टीने नुकसान झाल्याबाबत पत्रकारांनी आमदार सोळंके यांना विचारले असता ते म्हणाले की, माजलगाव मतदार संघातील माजलगाव, वडवणी, धारूर तालुक्याच्या तीनही तहसीलदारांना पंचनामे करण्याबाबत आदेशित केले आहे. तसेच शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरवला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांना सरसकट आर्थिक मदत देण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्याचे आमदार सोळंके यांनी सांगितले.