जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपवर उघड नाराजी व्यक्त केली आहे. काही महिन्यांपूर्वी एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपमध्ये गेल्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु अद्याप त्यांचा पक्ष प्रवेश झालेला नाही. अधिकृत पक्ष प्रवेश कधी होणार? असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला होता. परंतु आता खडसे यांनी पुन्हा एकदा युटर्न घेतल्याची चर्चा आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार यावे
एकनाथ खडसे म्हणाले की, ” राज्यात महाविकास आघाडीचे सरकार यावं. मागील काही महिन्यांपासून महायुती सरकारचा अनुभव चांगला वाटत नाही. राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून फोडाफोडीचे राजकारण करत आहेत. सूडबुद्धीने ईडी सीबीआय करवाई करत आहेत. जनतेची कामे होताना दिसत नाही”. यानंतर खडसे यांनी लाडकी बहीण योजनेवरून देखील राज्य सरकार देखील टीका केली आहे. ते म्हणाले की, ” लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने 46 हजार कोटी रुपये द्यावे. तसेच 46 हजार कोटी रुपये धरणे, रस्ते निर्मितीसाठी द्यावेत यातून स्थायी मालमत्ता निर्माण होण्यास मदत होईल. त्यामुळे मला हे महायुतीचे सरकार जावे आणि पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार यावे असे शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्याला नालायक म्हणत टीका केली होती. यावर देखील खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ” अर्थ खात्याला पैसे खर्च करताना ते विचार करून करावे लागतात. कोणीही आले आणि पैसे मागितले आणि त्यांना दिले तर राज्याची तिजोरी रिकामी व्हायला वेळ लागणार नाही. असं म्हणत खडसे यांनी अजित पवारांच्या अर्थखात्याची पाठराखण केली आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपल्या आहेत. अशातच कळत न कळत महायुतीमधील धुसपुस बाहेर येऊ लागली आहे. हे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विधानावरून दिसून येत आहे.वाटतयं”. असं खडसे म्हणाले आहेत.