गेवराई (रिपोर्टर): राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट झाली. मध्यरात्री या दोघांनी मराठा आरक्षणासह शेतकर्यांच्या विविध प्रश्नावर चर्चा केली. दस्तुरखुद्द मनोज जरांगे पाटील यांनी भेट झाल्याबाबतची माहिती देत केवळ शेतकर्यांबाबतचे प्रश्न आणि मराठा आरक्षण यावर चर्चा झाल्याचे सांगितले. अंतरवली सराटीला कोणीही येऊ शकतो. मी मातृत्वाच्या भूमिकेत असल्याचे सांगत कृषीमंत्र्यांनी शेतकर्यांचे चांगले काम केले तर कौतुक का करू नये? त्याचं कौतुकही करायला पाहिजे आणि चुकलं तर सोडलही जाणार नसल्याचे त्यांनी म्हटलं.
मध्यरात्रीच्या दरम्यान अंतरवली सराटी येथे राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट झाली. या भेटीनंतर राज्यभरात एकच चर्चा सुरू झाली, परंतु मनोज जरांगे पाटील यांनी या बैठकीबाबत स्पष्ट सांगितले. मी मातृत्वाच्या भूमिकेत आहे, माझी कुणीही भेट घेऊ शकतो, रात्रीच्या भेटीमध्ये केवळ मराठा आरक्षण आणि शेतकर्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली. बाकी कुठल्याही विषयावर चर्चा झालेली नाही. पुढे जरांगे पाटील म्हणाले,
मनोज जरांगे म्हणाले की, मी माझ्या मुद्यांवर ठाम असून माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं ते फक्त ओबीसीतून कायम ठाम असणार आहे. ज्यावेळी आमची आरक्षण संदर्भात चर्चा झाली तेव्हा व्यासपीठावर धनंजय मुंडे सुद्धा होते. घोंगडी बैठक परळीत होत असून आणि ती ताकदीने होणार असल्याचे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, मी कोणाचाच होऊ शकत नाही. कोणत्या महाविकास आघाडीचा, कोणत्या महायुतीचा मी नाही. मी फक्त मराठ्यांचा असल्याचे जरांगे म्हणाले. आंतरवाली सराटीत कोणीही येऊ शकतं तो आमचा पाहुणा आहे. मला इथं मातृत्वाची भूमिका घ्यावी लागते, असे जरांगे म्हणाले. मी जातीवादी नसल्याचे जरांगे यांनी नमूद केले.
तर कौतुक का करू नये?
मनोज जरांगे यांनी सांगतिले की, कृषिमंत्र्यांनी शेतकर्यांची चांगलं काम करायला लागली, तर कौतुक का करू नये? आमची आरक्षणावर चर्चा झाली. मला आरक्षणाशिवाय दुसरी वेळ नाही. समोरील व्यक्तीचं वेगळं असतं आणि माझं वेगळंच असतं असे त्यांनी सांगितले.