मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणू्क आयोगाचे शिष्टमंडळ दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यानंतर निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंह संधू यांनी पत्रकार परिषदे घेऊन दोन दिवसातील आढाव्याची आणि तयारीची माहिती दिली.
दोन दिवसांच्या या दौऱ्यात आयुक्त राजीव कुमार आणि त्यांच्यासोबतच्या शिष्टमंडळाने ११ राजकीय पक्षांसोबत चर्चा केली. यात काँग्रेस, भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, मनसे आदी पक्षांचा समावेश होता.या पक्षांनी निवडणुकीसंदर्भात काही सूचना, विनंती केल्या आम्ही त्या ऐकून घेतल्या. दिवाळी सणाचा विचार करून निवडणुकांच्या तारखांचा विचार करावा, अशा सूचना सर्वच पक्षांनी केल्याचे राजीव कुमार म्हणाले.
महत्त्वाचे मुद्दे-
> राज्यातील एकूण मतदारसंघ २८८
> विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे निवणूक प्रक्रिया त्याआधी पूर्ण करावी लागले
> आमचा महाराष्ट्र, आमचे मतदान अशी टॅगलाईन
> १ लाख १८६ हजार मतदान केंद्रे
> ३५० मतदान केंद्रेंवर नवतरुण अधिकारी नियुक्त असतील
> शहरातीस सर्व मतदान केंद्रात सीसीटीव्ही असतील यासाठी प्रयत्न
> ९ कोटी ५९ लाख मतदार-पुरुषांची संख्या ४.५९ कोटी, महिलांच्या संख्या ४.६४ कोटी
> २२ टक्के महिला मतदार वाढले
> ६.३ लाख दिव्यांग मतदार
> १०० वर्षांवरील मतदारांची संख्या ४९ हजार इतकी
> प्रथमच मतदान करणाऱ्या १८ ते १९ वर्षांवरील मतदारांची संख्या १९.४८ लाख इतकी
> शहरी आणि ग्रामीण भागात मतदान केंद्रांची संख्या सारखीच
> मोठ्या रांगा टाळण्यासाठी प्रयत्न
> रांगेतील मतदारांसाठी खुर्च्यांची सोय करणार
> मतदार कुठेही असो त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न
> जम्मू-काश्मीरमधील मतदान महाराष्ट्रातील
> काही मतदान केंद्रें फक्त महिलांच हाताळतील
> सक्षम APP द्वारे मतदान वाढवण्याचा प्रयत्न
> कुलाबा, कल्याण, पुणे कॅन्टोन्मेंट येथे मतदान फार कमी
> गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना वृत्तपत्रात ३ वेळा जाहिरात द्यावी लागणार
> दारू, पैसा अन्य गैरप्रकारांवर राज्यात ३००हून अधिक चेक नाके नजर ठेवतील