पहिली यादी 20 तारखेला घोषीत होणार
मुंबई, (रिपोर्टर)ः- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल कुठल्याही क्षणी वाजण्याची शक्यता असतांनाच महाविकास आघाडीने राज्यातल्या 288 जागांचे वाटप केल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. 288 पैकी काँग्रेस -119, ठाकरेंची सेना-86, शरद पवार गट-75, शेकाप-3, समाजवादी पार्टी-3, माकप-2 अशी तडजोड झाल्याचे सांगण्यात येत आहे. 15 टक्के जाग्यावर अद्यापही ओढातांन चालूच असल्याचे सांगितले जात असून 19 ते 20 तारखेला महाविकास आघाडी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहिर करेल असे ही सुत्रांचे सांगणे आहे.
राज्यातील भाजप, शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात नाराजगी असल्याचे सांगत महाविकास आघाडी 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचंड इच्छूक आहे. राज्यातल्या मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ यासह अन्य भागात सत्ताधार्यांना आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीने दंड थोपटले आहेत. महाविकास आघाडीचे अंतिम जागा वाटप झाल्याचे सुत्रांचे सांगणे आहे. केवळ 15 टक्के जागांवर अद्याप ओढाताण असल्याचे सांगितले जाते. सुत्रांच्या सांगण्यानुसार महाविकास आघाडतील क्राँगेस पक्षाला सर्वाधिक 119 जागांवर निवडणुक लढवायची आहे तर उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला 86 जागा देण्यात आल्या आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 75 जागांवर निवडणूक लढवायची असून शेकाप-3, समाजवादी पार्टी-3 आणि माकप साठी 2 जागा उद्याच्या निवडणुकीसाठी सोडविण्यात आल्या आहेत. राज्यातली विधानसभेची निवडणुक कुठल्याही क्षणी घोषीत होवू शकते. त्याअनुषंगाने आघाडीने जागा वाटप निश्चित करून निवडणुकीसाठी आपण तयार असल्याचे दाखवून दिले आहे.