बीड, (रिपोर्टर)ः- शेतकर्यांचे थकीत राहिलेले अनुदान तात्काळ देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी आज अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र निर्देशने करण्यात आली. यावेळी शेतकर्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
कापसाला 10 हजार तर सोयाबीनला 7 हजार रूपये भाव देण्यात यावा, सन 2023खरीप व रब्बी या दोन्ही हंगाामातील वंचित शेतकर्यांचा पिक विमा मिळवण्यासाठी तसेच या यादया गावनिहाय शेतकर्यांच्या नाव रक्कमेसह प्रकाशित करून पिक विम्यात पारदर्शकता आणण्यात यावी, महाडीबीटी अंतर्गत विशेष करून ठिबक व इतर योजनांचे बीड जिल्ह्यातील सर्व शेतकर्यांचे थकीत अनुदान तात्काळ देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी आज अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र निदर्शने करण्यात आली आहेत.
000
अवैध कंत्राटी भरतीला रोहियो तांत्रिक अधिकारी संघटनेचा तिव्र विरोध
चौकशी करून कारवाई करण्याची मागणी, भरतीत एका गावातील 15 ते 20 जणांचा समावेश
बीड, (रिपोर्टर)ः-रोहियो विभागामध्ये तांत्रिक अधिकारी व इतर पदाची भरती करण्यात आली. ही भरती नियमबाह्य असुन सदरील भरती एस अॅ इनफोटेक सर्व्हिसेस लि. कंपनीमार्फत करण्यात आली. या भरतीमध्ये विशेष करून एका गावातील 15 ते 20 जणांची निवड करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जावू लागले. या भरती प्रक्रियेला महात्मा गांधी राष्ट्रीय हमी योजना तांत्रिक अधिकारी संघटनेच्या वतीने विरोध करण्यात आला असुन या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली.
काही दिवसापुर्वी कंपनीने एपीओ/पीटीओ/सीडीईओ या पदासाठी भरती केलेली आहे. ज्यांची निवडकरण्यात आली. त्यांची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरती प्रक्रियेमुळे एकच गोंधळ उडाला. ही भरती प्रक्रिया अवैध असल्याचा आरोप केला जावू लागला. कुठल्या आधारावर भरती प्रक्रिया राबविण्यात आली असा प्रश्न उपस्थित केला जावू लागला. यामध्ये एका गावातील 15 ते 20 जणांचा सहभाग असल्याने आश्चर्य व्यक्त केले जावू लागले. या भरतीला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीणहमी योजना तांत्रिक अधिकारी संघटनेने विरोध दर्शविला असून या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.