बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा, मॉ साहेब यासह अन्य पतसंस्थेमध्ये खातेदारांचे लाखो नव्हे करोडो रुपये गुंतून पडलेले आहेत. या प्रकरणी अनेक गुन्हेही दाखल झाले आहेत. या दिवाळखोरीमध्ये राजस्थानी मल्टीस्टेटचाही समावेश आहे. राजस्थानीमध्ये डॉ. धूत यांनी 91 लाख 43 हजार 488 रुपये फिक्स डिपॉझिट जमा केले होते. त्यांचे पैसे मिळत नसल्यामुळे त्यांनी याबाबत तक्रार दाखल केली. त्यानुसार बँकेच्या अध्यक्षासह मॅनेजरवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी ज्ञानराधा, मॉ साहेब, राजस्थानी, साईराम यासह अन्य मल्टीस्टेट दिवाळखोरीत निघाले. यात खातेदारांचे करोडो रुपये अडकून पडलेले आहेत. या प्रकरणी मल्टीस्टेटविरोधात विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल झालेले आहे तर यातील काही आरोपी अटक तर काही फरार झालेले आहेत. परळीच्या राजस्थानी मल्टीस्टेट कॉ.सोसायटीमध्ये बीड येथील डॉ. रविंद्र हिरालाल धूत यांनी 91 लाख 43 हजार 488 रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये टाकले होते. त्यांचे पैसे परत मिळत नसल्यामुळे त्यांनी याबाबत बीड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार मल्टीस्टेटचे मॅनेजर संतोष आनेराव व अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्या विरोधात कलम 420, 406, 409, 34 भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.