मल्टीस्टेट प्रकरणी बियाणी यांच्यावर दाखल आहेत गुन्हे
परळी (रिपोर्टर): राजस्थानी मल्टीस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. या प्रकरणी अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. बियाणी आज स्वत:हून अंबाजोगाई न्यायालयाला शरण आले आहेत.
परळी येथील राजस्थानी मल्टीस्टेटमध्ये अनेक ठेवीदारांनी आपल्या ठेवी ठेवलेल्या आहेत. सदरील मल्टीस्टेटमध्ये अपहार झाला. या प्रकरणी मल्टीस्टेटचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. चार दिवसांपूर्वी बीड शहर पोलीस ठाण्यातही बियाणी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे दाखल झाल्यानंतर बियाणींसह इतर फरार झाले होते. आज सकाळी बियाणी हे अंबाजोगाई कोर्टामध्ये शरण आले आहेत. कोर्ट त्यांना किती दिवसांची कोठडी सुनावतं याकडे लक्ष लागून आहे.