• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मी पुन्हा आलो!!!देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ;आझाद मैदानावर सोहळा, दोन उपमुख्यमंत्र्यांना दिली जाणार शपथ

by गणेश सावंत
December 4, 2024
Reading Time: 1 min read
0
मी पुन्हा आलो!!!देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ;आझाद मैदानावर सोहळा, दोन उपमुख्यमंत्र्यांना दिली जाणार शपथ
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर): महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अकरा दिवसांनी आज महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली. भाजपाच्या विधीमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे फडणवीस होणार यावर शिक्कामोर्तब झाला. विधीमंडळ पक्षाचा नेता निवडीसाठी भाजपाचे केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सितारामण यांच्या नेतृत्वात पक्षाची बैठक झाली. आज दुपारी महायुतीचे नेते राज्यपालांना भेटून सरकार स्थापण्याचा दावा करतील. उद्या 5 डिसेंबर सायंकाळी 5 वाजता आझाद मैदान येथे मुख्यमंत्र्यांचा हा शपथविधी सोहळा होईल. या सोहळ्यात दोन उपमुख्यमंत्र्यांनाही शपथ देण्यात येणार आहे. सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती राहणार आहे. फडणविसांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्रात ‘मी पुन्हा आलो’, च्या मिम्सने जल्लोष साजरा केल्याचे दिसून येते.


    विधीमंडळ पक्षाचा नेता निवडीसाठी आज भाजपाचे केेंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सितारामण यांच्या उपस्थितीत भाजपाच्या नेत्यांची महत्वपुर्ण बैठक झाली. या बैठकीत भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील व सुधीर मुनगंटीवार यांनी विधीमंडळ नेतेपदासाठी देवेंद्र सरीताताई गंगाधर फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावाला पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण, संजय कुटे यांच्यासह अन्य आमदारांनी अनुमोदन दिले. त्यावेळी एकमताने विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली. त्यानंतर देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी फडणविसांचे स्वागत केले. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची निश्‍चिती झाल्याचे स्पष्ट झाले. आज दुपारी साडेतीन वाजता महायुतीचे तीन नेते एका शिष्टमंडळासह राज्यपालांना भेटतील आणि सरकार स्थापनेचा दावा करतील. उद्या 5 वाजता आझाद मैदानावर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणविसांचा शपथविधी होईल. या वेळी अन्य दोन उपमुख्यमंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली जाईल. फडणविसांच्या नावाची घोषणा होताच शपथविधी सोहळ्याची पत्रिकाही तात्काळ मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी काढली.
   मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार ही 2019 ची देवेंद्र फडणविसांची आत्मविश्‍वासू घोषणाची मध्यंतरी बरीच खिल्ली उडविण्यात आली. यादरम्यान फडणवीस यांच्या विरोधात प्रचंड आरोप-प्रत्यारोप झाले. त्यावर फडणविसांनी भाष्य केले नाही. शांत राहणे पसंत केले. अखेर आज त्यांची विधीमंडळ नेतेपदी घोषणा झाली आणि फडणवीस यांच्या त्या ‘मी पुन्हा येणार’ या वक्तव्याला ‘मी पुन्हा आलो’ च्या मिम्सचा सोशल मिडियावर पाऊस पडला.

फडणवीस म्हणाले, एक है तो सेफ है
विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर गेल्या जवळपास आठ दिवसांपासून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे अनेकांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार? हे स्पष्ट होत नव्हतं. मात्र, अखेर आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? हे स्पष्ट झालं आहे. आज भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची गटनेता निवडीची बैठक पार पडली. या बैठकीत गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची सर्व आमदारांनी एकमताने निवड केली. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी मुंबईत पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह काही राज्याचे मुख्यमंत्री आणि दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, आज देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी सर्व आमदारांचे आणि जनतेचे आभार मानले. तसेच आमदारांना संबोधित करत असताना एक है तो सेफ है असा नारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

Previous Post

आता आमचा मुड चांगला आहेफडणविसांचा अनुभव कामाला येईल -पंकजा मुंडे

Next Post

दुष्काळी जिल्ह्यात फळबागाची लागवड वाढली ; 3 हजार 500 हेक्टरमध्ये मोसंबी; तर2184 हेक्टरमध्ये आंब्यांची लागवड

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
अग्रलेख

अग्रलेख -वाचला असेल तुकातर राहू नको मुका

by गणेश सावंत
May 10, 2026
Next Post
दुष्काळी जिल्ह्यात फळबागाची लागवड वाढली ; 3 हजार 500 हेक्टरमध्ये मोसंबी; तर2184 हेक्टरमध्ये आंब्यांची लागवड

दुष्काळी जिल्ह्यात फळबागाची लागवड वाढली ; 3 हजार 500 हेक्टरमध्ये मोसंबी; तर2184 हेक्टरमध्ये आंब्यांची लागवड

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?