बीड, (रिपोर्टर)ः- धनादेश वटला नसल्याने या बाबत कोर्टामध्ये दाद मागण्या आली होती. कोर्टाने आरोपीला एक महिन्याची शिक्षा सुनावून 9 लाख 50 हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
आरोपी सुनिल आण्णासाहेब धुताडमल यांने प्रदिप नागनाथ इंदोरे यास पैसे देण्यापोटी 4 लाख 75 हजार रूपयांचा धनादेश दिला होता. सदरचा धनादेश बँकेत वटवण्यासाठी टाकला असता तो वटला नाही. फिर्यादीने आरोपी विरूध्द बीड येथील न्याय दंडाधिकारी कार्यालयात केस दाखल केली. त्या प्रकरणात दि.7 डिसेंबर 2024 रोजी न्यायालयाने आरोपी सुनिल धुतडमल यास दोषी धरून 1 महिन्याची शिक्षा ठोठावून 9 लाख 50 हजार रूपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात फिर्यादीतर्फे अॅड.येळे व अॅड.सुनिता बोडखे यांनी काम पाहिले.