परळी (रिपोर्टर): शहरातल्या इंडस्ट्रीज एरियामधून 45 वर्षीय व्यापार्याचे अपहरण करत तोंड बांधलेल्या चौघांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्याच्या जवळचे 87 हजार आणि सोन्याची चैन हिसकावून घेतली. एवढेच नव्हेतर त्याला स्विफ्ट डिझायरमधून परळी-अंबाजोगाई रोडवर फिरवत खंडणी मागितली. अखेर संबंधित व्यापार्याने घरून दहा तोळे सोन्याचं बिस्कीट मागवत ते अपहरणकर्त्याच्या स्वाधीन केले. अपहरणकर्त्यांनी रात्री एक वाजता संबंधित व्यापार्याला परळी-अंबाजोगाई रोडवरील गिरवली येथे सुखरुप सोडून दिले. आज सकाळी शेकडो नागरिकांनी पोलीस स्टेशन गाठत संबंधित व्यापार्यावरची आपबिती पोलिसांना सांगितली तेव्हा आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु जाली आहे.
परळी शहरातील टेलर लाईन मोंढा भागात राहणारे पंचेचाळीस वर्षीय व्यापारी अमोल विकासराव दुबे हे रात्री इंडस्ट्रीज एरियामध्ये होते. अमोल दुबे यांना उचलण्यासाठी दबा धरून बसलेले अपहरणकर्ते हे स्विफ्ट डिझायरमध्ये आले. दुबे यांना पकडत त्यांनी स्विफ्ट डिझायरमध्ये टाकून त्यांना रिव्हॉल्व्हरच्या धाकावर परळी शहराबाहेर घेऊन गेले. तू आज दिवसभरात काय केले, गेल्या आठ-दहा दिवसात काय केले हे सर्व आम्हाला माहित आहे, असे म्हणत दुबेंच्या जवळ असलेले 87 हजार आणि गळ्यातील सोन्याची चैन अपहरणकर्त्यांनी काढून घेतली. एवढेच नव्हेतर तुला सुटका करून घ्यायची असेल तर आणकी पैसे आण, सोनं आण, असं म्हटल्यानंतर दुबेंनी आपल्या घरून दहा तोळ्याचं सोन्याचं बिस्कीट मागवून घेत अपहरणकर्त्यांच्या स्वाधीन केलं. संबंधित अपहरणकर्त्यांनी व्यापारी अमोल दुबे यांना रात्री एकच्या सुमारास परळी-अंबाजोगाई रोडवरील गिरवलीजवळ सोडून दिले. या घटनेने परळीतील व्यापार्यात प्रचंड भीतीचे वातावरर निर्माण झाले आहे. आज सकाळी शेकडो णांच्या जमावाने परळीच्या पोलीस ठाण्यात डेरेदाखल होत घटनेची माहिती दिली तेव्हा पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली.