परळी (रिपोर्टर) केज उपविभागाचे पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व त्यांच्या पथकाने रात्री साडेबारा च्या दरम्यान पत्त्याच्या कल्बवर कारवाई करून 29 जुगार्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चार चारचाकी सह 26 मोबाईल, नगदी 3 लाख 86 हजाराची रोकड असा एकून 58 लाख 67 हजार 680 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
परळी तालुक्यातील भोपला शिवारातील विठ्ठल मुंडे यांच्या शेतातील पत्र्याच्या बंद रूममध्ये जुगार आड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन परळी ग्रामीण पोलिसांसह पंकज कुमावतांच्या पथकाने त्या ठिकाणी धाड टाकली. या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पो स्टेशन परळी येथे गुन्हा दाखल करण्यात आला. ताब्यात घेतलेल्या जुगार्यांमध्ये रविशंकर व्यंकटराव मुंडे राहणार वरवटी 2) बालाजी भास्कर चाटे राहणार बँक कॉलनी अंबाजोगाई 3) संभाजी बाबासाहेब भोसले राहणार विशाल नगर लातूर 4) निलेश अशोक फळ राहणार धर्मापुरी परळी 5) अजीम मुस्तफा रॉकी राजा मोहल्ला केज 6) अशोक सुधाकर घुले राहणार टाकळी तालुका केज 7) पवन शामसुंदर चांडक रा. अजिंक्य सिटी लातूर 8)बालाजी लिंबाजी काकडे राहणार सावळा तालुका केज 9) फर्मान मन्ना शेख राहणार मलीपुरा परळी 10) अजझर नसीर सय्यद राहणार रत्नापूर चौक लातूर 11) सत्तार मुन्ना शेख राहणार कळंब जिल्हा उस्मानाबाद 12) निखिल बालासाहेब मुंडे राहणार शेपवाडी तालुका अंबाजोगाई 13) संतोष नागनाथ आप्पा बरदापुर राहणार मोती नगर लातूर 14) सतीश भारत गिरी रा सिद्धेश्वर नगर लातूर 15) मोहन दौलतराव मुंडे राहणार क्रांतीनगर अंबाजोगाई 16) ताहेर युसुफ शेख गांधीनगर कळंब तालुका कळंब 17) जफर सलीम शेख राहणार क्रांतीनगर अंबाजोगाई 18) हुसेन मोईन सय्यद राहणार पाटील चौक लातूर 19) शेख सलमान शेख मुस्तफा राहणार सारे गल्ली अंबाजोगाई 20) जरीन खान सुजात अली पठाण राहणार मलिकपुरा परळी 21) दत्तात्रेय वामन दुंदुले राहणार स्नेह नगर परळी 22) वैजनाथ आप्पाराव शिंदे राहणार माणिक नगर परळी 23) सय्यद मोहम्मद आली सादिक राहणार झारे गल्ली अंबाजोगाई 24) राजेश शंकरराव सवराते राहणार पूर्णा तालुका पूर्णा जिल्हा परभणी 25) दीपक दत्ता करपे राहणार संभाजी नगर अंबाजोगाई 26) अनिल रामभाऊ सवराते राहणार प्रकाश नगर लातूर 27) सिद्धार्थ लालू मकरंद राहणार गोवर्धन हिवरा तालुका परळी 28) अरविंद माणिकराव शेप राहणार शेपवाडी तालुका अंबाजोगाई 29 लोकांवर कारवाई करुन अटक केले. सदरची कारवाई सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत, सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद शिंदे, बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, पोलीस नाईक दिलीप गीते, राम हरी भंडाणे, अनिल मंदे, महादेव बहिरवाल, टुले, राजू वंजारे, जावळे यांच्यासह परळी ग्रामीण पोलिसांनी केली. सदरचा प्रकरणात पुढील तपास ग्रामीण पोलिस स्टेशनचे सपोनि मारोती मुंडे हे करत आहेत.