जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी संगीतखुर्ची आंदोलन

बीड, (रिपोर्टर)ः-बीड पंचायत समितीमध्ये शेतकर्यांची कामे वेळेवर होत नाहीत. अधिकार्यांसह कर्मचारी कार्यालयात थांबत नसल्याने कामे पेडींगमध्ये पडली आहेत. आज कर्मचार्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यात्यांनी लक्षवेधी संगीतखुर्ची आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेेतले आहे. हे आंदोलन डॉ.गणेश ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
गेल्या काही दिवसापासून बीड पंंचायत समितीमध्ये घरकुल, फळबाग, गायगोठा, शेवगा लागवड, खडीकरण, पाणंद रस्ते यासह इतर कामांचे मस्टर काढणे बंद आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कार्यालयात अधिकारी व कर्मचारी वेळेवर हजर राहत नसल्याने कामे होत नाहीत. अधिकार्यांच्या निषेधार्थ आज सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्षवेधी संगीतखुर्ची आंदोलन केले. यावेळी डॉ.गणेश ढवळे, शेख मुबीन, शेख युनूस, सुदाम तांदळे, शिवशर्मा शेलार, शेख मुस्ताक, रामधन जमाले, अशोक येडे, सादेक सय्यद, कैलाशचंद पालेवार, रामभाऊ शेलकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.