रस्त्यात खड्डेच खड्डे, इतर सर्व रस्ते झाले हा रस्ता का होत नाही

बीड, (रिपोर्टर)ः- शहरातील विविध परिसरातील रस्त्याचे काम गेल्या काही महिन्यामध्ये पूर्ण झाले आहे. शहरात व्यवस्थीत रस्ते असल्यास वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत नाही. शहरातील राजुरी वेस ते बलभिम चौक ते चांदणी चौक या दरम्यानचा रस्ता अत्यंत खराब आहे. जागो जागी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. हा रस्ता कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावर पाणी जमा होवून नालीचे पाणी नागरीकांच्या घरात व व्यापार्यांच्या दुकानात घूसत असते. सदरील रस्ता नगर पालिकेने तात्काळ करावा अशी मागणी या परिसरातील नागरीकांकडून केली जात आहे.
राजुरी वेस ते बलभिम चौक ते चांदणी चौक या दरम्यानचा रस्ता खराब झालेला आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते या रस्त्याने बलभिम महाविद्यालय, कंकालेश्वर शहेंशाहवली दर्गा, पेठ बीड, धोंडीपुरा व इतर ठिकाणी जावे लागते. रस्त्यात जागो जागी खड्डे पडलेले आहेत. खड्डयामुळे वाहनधारकांना वाहन चालविण्यास अडचण येतात. रस्त्याचे रूंदीकरण होवून अनेक वर्षे लोटले मात्र रस्त्याचे काम झाले नाही. शहरातील काही मुख्य रस्त्याचे काम झाले. मात्र हा रस्ता अजुनही प्रलंबित आहे. या रस्त्याचे काम कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.








