जिल्ह्याचा निकाल 96 टक्के
यंदाही मुलांपेक्षा मुलीच भारी

बीड (रिपोर्टर): महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज घोषीत झाला. बीड जिल्ह्यात यावर्षीही 97.73 टक्के मुलींनी उत्तीर्ण होत सयत्ता दहावीच्या परीक्षेत आपली पताका फडकवली. मुलांमध्ये निकालाची टक्केवारी ही 96.47 टक्के एवढी आली असून बीड जिल्ह्यात एकूण 41 हजार 541 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 40 हजार 77 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
मार्च 2024-2025 या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या मार्च महिन्यातील इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज लागला. छत्रपती संभाजीनगर विभागीय शिक्षण मंडळाने आज या निकालाची घोषणा केली. बीड जिल्ह्याचा निकाल हा 93 टक्के लागला असून परीक्षेसाठी 24 हजार 319 मुले व 17 हजार 222 मुली परीक्षेस बसले होते. त्यापैकी मुलांमध्ये 23 हजार 245 तर मुलींमध्ये 16 हजार 832 परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. टक्केवारीमध्ये मुलींचा निकाल हा 97.73 टक्के तर मुलांचा निकाल 96.47 टक्के एवढा लागला. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 4.8 ने अधिक असल्याचे आज दिसून आले. इयत्ता दहावीत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थींनीचे सायं. दैनिक बीड रिपोर्टर तर्फे हार्दिक अभिनंदन!
शालेय शिक्षणातून पुढच्या शिक्षण प्रवासाची सुरुवात म्हणजे दहावीच्या परीक्षेचा निकाल. महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्राचा यंदाचा निकाल हा तब्बल 94.10 टक्के इतका लागल्याचं मंडळातर्फे सांगण्यात आलं आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून 9 शिक्षण विभागातून तब्बल 15 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. त्यातून जवळपास 14 लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
किती विद्यार्थी बसले होते एसएससी परीक्षेला?
यंदा दहावीला पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि रत्नागिरी या 9 विभागीय मंडळात एकूण 15 लाख 58 हजार 20 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 लाख 46 हजार 579 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आणि त्यापैकी 14 लाख 55 हजार 433 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 94.10 टक्के आहे, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. याशिवाय यंदा एकूण 28 हजार 512 खासदी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 28 हजार 20 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 22 हजार 518 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
या परीक्षेला राज्यातल्या 9 विभागीय मंडळातील नियमित, खासगी, पुनर्परीक्षार्थी व दिव्यांग विद्यार्थी मिळून 16 लाख 10 हजार 908 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 लाख 98 हजार 553 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 14 लाख 87 हजार 309 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्या सर्वांची उत्तीर्णतेची टक्केवारी 93.04 टक्के आहे.
विभागनिहाय निकाल (सर्वाधिक ते सर्वात कमी क्रमाने)
कोकण विभाग – 98.82 टक्के
कोल्हापूर विभाग – 97.45 टक्के
मुंबई विभाग – 95.84 टक्के
पुणे विभाग – 94.81 टक्के
नाशिक विभाग – 93.04 टक्के
अमरावती विभाग – 92.95 टक्के
छत्रपती संभाजीनगर – 92.82 टक्के
लातूर विभाग – 92.77 टक्के
नागपूर – 90.78 टक्के
गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तीर्णांची टक्केवारी घटली
राज्यात 23 हजार 489 माध्यमिक शाळांपैकी 7 हजार 924 शाळांचा निकाल 100 टक्के इतका लागलेला आहे. मार्च 2022 चा निकाल 96.94 टक्के होता. मार्च 2023 चा निकाल 93.83 टक्के होता. मार्च 24 चा निकाल 95.81 टक्के होता. या वर्षीचा निकाल 94.10 टक्के लागला आहे. म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी निकालाची टक्केवारी 1.71 टक्क्यांनी कमी झाली आहेत.
प्रथम-द्वितीय-उत्तीर्ण श्रेणीची टक्केवारी