अध्यक्षा सुशीबेन यांची बकरवाडीला भेट
अवैध गर्भपातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या घरी कोणीच नाही, जिल्हा प्रशासनाने संबंधित कुटुंबाला माहितीच दिली नाही, प्रशासनाच्या ग्रामसेवकापासून बालकल्याण विभागाच्या
अधिकार्यापर्यंत सुशीबेन यांची नाराजी
बीड (रिपोर्टर) मी मुलींची भेट घेऊन त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी काय करता येईल यासाठी बीड जिल्ह्याच्या दौर्यावर आले होते, त्यातूनच मी बकरवाडी येथे अवैध गर्भपातातून मृत्यू झालेल्या मातेच्या मुलाला भेटण्यासाठी आले होते. मात्र जाणीवपुर्वक यंत्रणेने आणि या कुटुंबाने माझी आणि मुलींची भेट होऊ दिली नाही. याठिकाणी महिला बालहक्क कल्याण विभागाचे प्रशासन पुर्णत: फेल झाले आहे. याची रितसर मी चौकशी करेलच तर जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी तडवी हे या दौर्यात अनुपस्थित राहून त्यांनी आपल्या बेजबाबदारपणाचा कळस गाठला त्यामुळे राज्य बालहक्क आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती शहा यांना मयत पावलेल्या महिलेच्या मुलींची भेट न घेताच परत परतावे लागले.
गेल्या दोन महिन्यापुर्वी बीड तालुक्यातील बकरवाडी येथील गाडे कुटुंबातील महिलेचे मुलीचा गर्भ असल्याने अवैध गर्भपात करत असताना मृत्यू झाला होता. हे प्रकरण पुर्ण राज्यभर गाजले होते. मयत झालेल्या श्रीमती गाडे यांना अगोदरच तीन मुले आहेत. यातील मयत महिलेचा पती हा जेलमध्ये आहे. आई मृत्यू पावलेली आहे. त्यामुळे आई-वडिलांविना बेवारस झालेल्या तीन मुलींची भेट घेण्यासाठी बीड या ठिकाणी राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती सुशीबेन शहा या जिल्हा दौर्यावर आल्या असून आज सकाळी त्या घाटसावळी नजीक बकरवाडी या ठिकाणी मयत महिलेच्या तीन मुलींना भेटण्यासाठी गेल्या होत्या. कालपासूनच त्यांनी महिला बाल कल्याण विभागाच्या शासकीय अधिकार्यांना या मुलींची भेट घालून देण्याचे आदेश दिले होते. सकाळी जेव्हा श्रीमती शहा या जिल्ह्याचे बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष अशोक तांगडे यांच्यासोबत बकरवाडी येथे गेल्या असता या मुलींचे काका मुलींना घेऊन ग्रामीण भागातील एका यात्रेला गेले होते तर आजी ही शेतात गेली होती त्यामुळे मयत महिला गाडे यांच्या घरचे कोणीही शहा यांना भेटू शकले नाही. कालपासूनच या कुटुंबियाला बाल हक्क आयोगाच्या अध्यक्ष आणि इतर शासकीय अधिकारी या मुलींची भेट घ्यायला येणार आहेत, याचा निरोपही देण्यात आला होता. मात्र जाणीवपुर्वक या कुटुंबियाने मुलींची भेट शहा यांच्यासोबत होऊ दिली नाही. अध्यक्षासोबत मुलींची भेट घालून देण्यासाठी शासकीय यंत्रणा फेल झाली आहे. श्रीमती शहा यांनी या वेळेस उपस्थित अधिकार्यांना विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तरे देता आले नाहीत. महिला बालकल्याण अधिकारी हे तर चक्क या दौर्यामध्ये अनुपस्थित राहिले. जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी केकाण शिष्टाचार म्हणून या दौर्यात सहभागी झाले होते. ज्यांचा संबंध येतो असे तडवी हे अनुपस्थित राहिले तर तालुका महिला बालकल्याण अधिकारी श्रीमती तांदळे, बालसंरक्षण अधिकारी कदम या दौर्यात सोबत होत्या मात्र तांदळे आणि कद मयांना शहा यांनी मुलींची नावे विचारली ती नावेही त्यांना सांगता आली नाही. ग्रामसेवक वाघमारे आणि इतर महिला बालकल्याण विभागाच्या कोणत्याही अधिकार्याला एकाही प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. त्यामुळे आता बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा या दोषींवर कायक कारवाई करणार याकडे लक्ष लागून राहिलेले आहे.