गेवराई (रिपोर्टर) शनीचं राक्षसभुवन सर्वत्र परिचीत आहे. या ठिकाणी अनेक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या, मात्र दुर्दैव असं आहे की, गावात स्मशानभूमी नाही. दोन दिवसांपुर्वी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. पावसामुळे अंत्यसंस्कार कसा करायचा? असा प्रश्न नातेवाईकांना पडल्यानंतर नातेवाईकांनी थेट गेवराईच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. गावात स्मशानभूमी बांधण्याची मागणी केली जात आहे.
गेवराई तालुक्यातील शनीच्या राक्षसभुवन येथे नेहमीच शेकडो भाविक-भक्त दर्शनासाठी येत असतात. या गावामध्ये अनेक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या, असे असताना गावात स्मशानभूमी नाही. दोन दिवसांपुर्वी गावातील सुनिल केशव चोथाईवाले यांचे निधन झाले. पाऊस असल्यामुळे अंत्यसंस्कार करण्यास व्यत्यय येत असल्याने नातेवाईकांनी गावात अंत्यसंस्कार करण्याऐवजी गेवराई शहरातील चिंतेश्वर स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले. गावात स्मशानभूमी असावी, अशी मागणी नेहमीच करण्यात आली मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. स्मशानभूमी करण्याची मागणी गावकर्यांकडून होत आहे.