बीड (रिपोर्टर) यावर्षी गोगलगायीने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान केले. नुकसानग्रस्त शेतीपिकाचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेले होते. बीड जिल्ह्याचे केज, अंबाजोगाई आणि बीड या तीन तालुक्यात 12,959 हेक्टरमधील नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त शेतकर्यांना राज्य शासनाने मदत जाहिर केलेली आहे. जिरायत क्षेत्रासाठी 6800 प्रति हेक्टर तर बागायत क्षेत्रासाठी 13500 प्रति हेक्टर नुकसान भरपाई मिळणार आहे.
यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्यानंतर शेतकर्यांनी जून महिन्यात पेरण्या केल्या. बीड जिल्ह्यात खरिपाचे 8 लाख हेक्टर क्षेत्र आहे. यातील सर्वाधिक 4 लाख हेक्टरमध्ये सोयाबीनची लागवड झाली होती. सोयाबीनला जिल्हाभरातील शेतकर्यांनी प्रथम पसंती दिली होती. मात्र सोयाबीनवर गोगलगायीने हल्ला चढवला. गोगलगायीमुळे नुकसान झालेल्या शेतीपिकाचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. तीन तालुक्यात गोगलगायीमुळे नुकसन झाले. केज तालुक्यात 35 हेक्टर, अंबाजोगाई 12820 तर बीड तालुक्यात 104 हेक्टरमध्ये नुकसान झाले. एकूण 12959 हेक्टर बाधीत क्षेत्र म्हणून नोंद करण्यात आली आहे. दरम्यान जिरायत क्षेत्रासाठी 6800, बागायत क्षेत्रासाठी 13500 रूपये नुकसान भरपाई शासनाकडून मिळणार आहे.