Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeक्राईमक्राईम डायरी- बेवड्या मित्राने घात केला प्रकाशचा जीव गेला

क्राईम डायरी- बेवड्या मित्राने घात केला प्रकाशचा जीव गेला

मैत्री हे जपल तर सर्वात श्रेष्ठ एक नाते आहे, आपले भाऊ/बहीण सगे सोयरे कसेही असोत आपल्याला ते नाते मान्य करावेच लागते. पण मैत्री हे असे नाते आहे जे आपण स्वतः ठरवून रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक घट्ट नाते बनवू शकतो. मैत्रीत वयाचा गरीब, श्रेमंतीसह जातीपातीचा कसलाच भेदभावही नसतो. मैत्री हे एक अनमोल नाते आहे. ते रक्ताच्या नात्याइतकेच मैत्रीचे नातेदेखील घट्ट असते. प्रेमापेक्षा मैत्री महत्त्वाची असते कारण प्रेम तर सगळ्यांना एकदा तरी रडवते आणि मैत्री ही दुःखात हसवते. ज्याच्या जवळ मनातील भावना व्येक्त करताना संकोच वाटत नाही, पाप पुण्य सांगण्यात व कबुली देण्यास कमी पणा वाटत नाही, ज्यांना आपला पराकर्म आनंदात सांगावासा वाटतो तो आपला लंगुटी यार म्हणजे मित्र असतो. त्याचे दुःख ते आपलें दुःख असते. मात्र अशात मैत्रीचा ट्रेन्ड बदलला आहे. स्वार्थासाठी मैत्री जोडणार्‍यांची संख्या दिवसेन् दिवस वाढत आहे. ‘कामापुरता माम’ म्हणून मित्राचा वापर होत आहे. तर केव्हा केव्हा क्षुल्लक कारणावरुन मैत्री तुटते अन् एकमेकांचे ते कट्टर दुश्मनही बनता. मात्र बीडमध्ये १० जानेवारी २०२१ च्या सकाळी शहराच्या पश्‍चिम दिशेला असलेल्या अंकुशनगर भागात एक घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली होती. यामध्ये क्षुल्लक कारणावरून मित्राने मित्राचा दगडाने ठेचून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर होता.

crime dayri logo 2


प्रकाश बळीराम गायकवाड (वय ३० वर्षे, रा. डिग्रस ता. गेवराई ह. मु. कपिलमुनी मंदिरापाठीमागे अंकुश नगर बीड) हा बीड शहरातील एका लाईट हाऊसमध्ये कामाला होता. मात्र कोरोनाच्या काळात लॉकडाऊन असल्याने तो घरी होते अन् पुन्हा तेथे कामाला गेला नाही. त्यांनतर शहरातील एका व्यापार्‍याकडे वाहन चालक म्हणून काम करु लागला. दि. १० जानेवारी २०२१ रोजी त्याने भाजी बनविण्यासाठी अंडी घेतली अन् पत्नीला भाजी बनव मी आलोच म्हणून घरातून निघून गेला, त्यानंतर तो घरी आलाच नाही. पत्नीने रात्री उशिरापर्यंत त्याची वाट पाहिली मात्र तो घरी परतलाच नाही. पहाटे लोक व्यायाम करण्यासाठी अंकुश नगर चर्‍हाटा रोड वर गेले असता तेथे प्रकाश गायकवाडची बॉडी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. याच वेळी स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले मनोज वाघ हे रात्री आपले कर्तव्य पार पाडून घराकडे जात असतांना त्यांना अंकुश नगरमध्ये खून झाल्याची माहिती मिळाली. मनोज वाघ हे देखील त्या भागात राहत असल्याने त्यांनी तेथील लोक ओळखीचे आहेत. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेवून याची माहिती वरिष्ठांना दिली. त्यांनतर घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत, पो.ह. खेडकर, पो.ह. तांदळे, पो.ह. शेख, पो.ना. ठोबरे चालक पो.ना. वंजारे अशी टिम दाखल झाली. याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी शिवाजीनगर पोलिसांनी भेट देत घटनेचा पंचनामा केला.

त्यावेळी घटनास्थळी मतय प्रकाश गायकवाड याची दुचाकी तेथेच आढळून आली होती. ज्या दगडाने ठेचून त्याचा खून केला होता. तो दगडही आरोपी तेथेच टाकून पळून गेला होता. हा खून रात्री आठ च्या नंतर झाला असल्याचा संशय पोलिसांना आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत न्यांनी आरोपी फरार होवू नये म्हणून तत्काळ त्याचा मागावर पथक पाठवले. अन् गुन्ह्याची उकल करण्यात ‘एक्सपर्ट’ असलेल्या राऊत यांनी मयत प्रकाश गायकवाड याचा खून झालेल्या दिवशी त्याचा सोबत कोण कोण होते. शेवटी त्याला कोण भेटले याची इत्यभूत माहिती घेतली असता. महादेव सर्जेराव शिंदेचे नाव समोर आले. अन् पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो फरार असल्याचे समजले. गुन्हा घडल्याच्या अवघ्या १२ तासात स्थानिक गुन्हे शाखेने पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून महादेवच्या मुसक्या अवळल्या. अन् त्याची चौकशी सुरु केली. सुरुवातीला उडवाउडविची उत्तरे देणार्‍या महादेवला राऊत यांनी विश्‍वासात घेताच त्यानेच मित्राचा खून केल्याची कबुली दिली.


१० जानेवारी २०२१ रोजी ५.३० वाजता. आरोपी महादेव सर्जेराव शिंदे (वय ३५ वर्षे धंदा नाही. रा. शिंदे वस्ती जुना चर्‍हाटा रोड पालवन ता. जि. बीड) याने मयत प्रकाश बळीराम गायकवाड (वय ३० वर्षे, रा. डिग्रस ता. गेवराई ह. मु. कपिलमुनी मंदिरापाठीमागे अंकुश नगर बीड) याला फोन केला अन् तु आज दारु पाज म्हणून घराबाहेर बोलावून घेतले. ते दोघे प्रकाशच्या दुचाकीवर बसून जवळच असलेल्या एका धाब्यावर गेले अन् तिथेच दारु पिले. अन् पुन्हा दुचाकीवर घराकडे निघाले. त्यावेळी सोबत आणलेली दारु पिण्यासाठी चर्‍हाटा रोडच्या बाजूला बसले. तेथे दारु पिल्यानंतर दारु पिण्याच्या कारणावरुनच त्यांचा वाद झाला. दोघांनीही एकमेकाच्या आई-बहिनींचा उद्दार केल्यानंतर वाद चिघळत गेला. याच वादातून प्रकाशने महादेव याला दगड फेकून मारला तासा तो महादेवच्या कपाळावर बसला. मात्र दगड मारतांना प्रकाशचा तोल जावून तो जमिनिवर पडला होता. महादेव याला दगड मारल्याचा भयंकर राग आला अन् त्यानेही जवळच पडलेला मोठा दगड घेतला अन् प्रकाशच्या डोक्यात घातला. तसा प्रकाश जागेवर गतप्राण झाला. त्यांनतर महादेव प्रचंड घाबरला अन् घरी जावून भावाची दुचाकी घेवून तो मांजरसुब्याकडे गेला. चौसाळ्याला एका नातेवाईकाकडे गेल्यानंतर त्यांना पैशाची मागणी केली. मात्र तो नशेत असल्याने नातेवाईकांनी त्याला पैसे दिले नाहीत. मात्र जेवन दिले. पैसे घेवून तो फरार होणार होता. मात्र पैसे मिळाले नसल्याने तो पून्हा त्याच रात्री वापस बीडकडे येत असतांना मांजरसुब्याजवळील घाटात सरकारी बाथरुम जवळ त्याची दुचाकी स्लिप झाल्याने तो खाली पडला अन् त्या अपघातात त्याच्या डोक्याला पायाला मार लागल्याने तो बेशुध्द झाला. एका हॉटेल चालकाने एका वाहनचालकाच्या मदतीने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरु असतांना पहाटे पाच वाजता तो शुध्दिवर आल्यानंतर त्याने दवाखाण्यातील एकाचा फोन घेवून मी दवाखाण्यात असल्याचे घरी सांगितले. अन् दवाखाण्यातून कोणालाच न सांगता फरार झाला. तसा तो मांजरसुब्याला गेला अन् तेथे पडलेली दुचाकी घेवून परत पिंपळनेर कडे गेला तेथून तो पैसे घेवून फरार होणार होता. इकडे शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मयत प्रकाश गायकवाड याची पत्नी ज्योती हीची फिार्याद नोंदविणे सुरु होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत यांना आरोपी पिंपळनेरला जात असल्याची माहिती मिळताच त्यांनी त्याच्या मागावर एक पथक पाठवले अन् त्याला पिंपळनेर हद्दीतून सहाय्यक पोलिस निरिक्षक आनंद कांगुणे, पो.ना. मनोज वाघ, हनुमान खेडकर, रामदास तांदळे, शेख नसीर, कैलास ठोंबरे, राजूव वंजारे यांनी ताब्यात घेतले. आरोपी महादेव सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देवू लागला मात्र राऊत यांनी त्याला विश्‍वासात घेतले असता. त्याने मित्राचा खून केल्याची कबुली दिली. आरोपी अटक केल्यानंतर मयत प्रकाशची पत्नी ज्योती हिच्या फिर्यादीवरुन आरोपी महादेव सर्जेराव शिंदे (वय ३५ वर्षे धंदा नाही. रा. शिंदे वस्ती जुना चर्‍हाटा रोड पालवन ता. जि. बीड) याच्या विरुध्द शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुरनं ११/२०२१ कलम ३०२ भादवी गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी महादेव याला शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरिक्षक नितिन पाटील यांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला ५ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस अधिक्षक राजा रामा स्वामी, अप्पर पोलिस अधिक्षक सुनिल लांजेवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत, शिवाजीनगर पोलिस ठाणे प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक नितिन पाटील हे करत आहे. त्यांना स्थानिक गुन्हे शाखा आणि शिवाजीनगर पोलिसांचे सहकार्य मिळाले आहे.

Most Popular

error: Content is protected !!