बीड (रिपोर्टर) गेल्या दोन महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने बीड जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्याचे आवाहन करण्यात येत होते. तरी देखील रक्तसंकलन होत नव्हते मात्र गेल्या चार-पाच दिवसात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवा दरम्यान शिबीरे झाले आणि त्यातून रक्तसंकलन झाले असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली. आजही दिवसभर सहा ठिकाणी रक्तदान शिबिरे घेण्यात येणार आहेत.
गेल्या दोन महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यात रक्ताचा मोठा तुटवडा भासत होता. नातेवाईकांना रक्ताची पिशवी मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत असे. रक्तदाते शोधून आणावे लागत होते तर आरोग्य प्रशासन वेळोवेळी कॅम्पचे आयोजन करण्याचे आवाहन करत होते. मात्र गणेश उत्सवाच्या काळात बीड जिल्ह्यात अनेक मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवत रक्तदान शिबिरे घेतले. या शिबीरातून सध्या मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन झाले आहे. 270 बॅग सध्या शिल्लक आहेत तर तांबड्या पिशीच्या 260 आणि पांढर्या पेशीच्या 250 बॅग जिल्हा रुग्णालयात शिल्लक आहेत. आजही सहा ठिकाणी रक्तदान शिबिर होणार आहेत. एकूणच गणराया ब्लड बँकेला पावले आहेत.