Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeक्राईमखाजगी सावकाराच्या तगाद्याने तरुण बेपत्ता अपहरण केल्याचा कुटूंबीयांचा आरोप

खाजगी सावकाराच्या तगाद्याने तरुण बेपत्ता अपहरण केल्याचा कुटूंबीयांचा आरोप


बीड (रिपोर्टर)ः खाजगी सावकाराच्या तगाद्याला कंटाळून बीड शहरातील स्वराज्यनगर येथील २५ वर्षीय तरुण बेपत्ता झाला आहे. या प्रकरणी त्याचे अपहरण केले असल्याचा आरोप कुटूंबीयांनी केला आहे.
अभिजीत अशोक गव्हाणे (वय २५ रा.स्वराज्यनगर, बीड) असे तरुणाचे नाव आहे. अभिजीतच्या बहिणीने पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अभिजीत हा घरात रडत होता, अक्षय मोरे नावाचा सावकार महिन्यापासून पाच लाख व्याजाचे दे म्हणत त्रास देत आहे. पैसे न दिल्यास जीवे मारण्याच्या फोनवरुन धमक्या देत आहे. १८ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास अक्षय मोरेचा अभिजीतला फोन आला. त्याला भेटण्यासाठी तो घराबाहेर पडला. तो घरी परतलाच नाही. त्याची सर्वत्र नातेवाईकांकडे शोधाशोध केली मात्र तो कुठेच सापडला नाही. त्यात मोरे व त्याच्या सोबत काही तरुण घरी येवून कुटूंबातील सदस्याना जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे. अभीजीतचेही त्यांनीच अपहरण केल्याचा संशय आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करावी असे निवदेनात म्हटले आहे. तसेच या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मिसींग दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!