मुंबई (रिपोर्टर) सध्या राज्यात मुसळधार पावसाने अनेक शेतकर्यांचे आणि नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच राज्यभरात प्राण्यामध्ये वेगाने पसरत असलेल्या लम्पी या आजारावर राज्य शासनाने लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. लम्पी आजाराबद्दल बरेचसे गैरसमज दूर करणे गरजेचे असल्याचंही त्यांनी सांगितलं.लम्पि वर बोलल्या नंतर सरकारच्या कार्यप्रणालीवर भाष्य करताना अजितदादांनी शिंदे -फडवणीस सरकारची चंपी केली ते म्हणाले राज्यातील काही जिल्हात अद्दाप पालकमंत्री नाहीत जे मंत्री आहेत ते पित्रपक्षामुळे काम करत नाहीत आपण कुठल्या जगात वावरत आहोत. मिरवणुका किती वेल ठेवायच्या, आवाज किती असावा, याचा ताळमेळ नाही. यापेक्षा पैठणला मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी थेट अंगणवाडी ताई यांना उपस्थित राहण्याच्या सूचना आदेश काढून दिल्या जातात, असं हाते असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. मी या सर्व गोष्टींचा धिक्कार करतो.
लम्पी आजारामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला असून त्यामुळे दूध व्यवसायावर परिणाम झाला आहे. हा आजार झालेल्या प्राण्यांचे दुधही शरीरासाठी घातक आहे. त्यामुळे येत्या हंगामातील साखर कारखाने सुरू होण्यापूर्वी लम्पी आजारावर आळा घालणे गरजेचं आहे. अशा प्राण्यांना विमा संरक्षण देण्यासाठीही उपाययोजना सरकारने कराव्यात. यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार आहे. असंही अजित पवारांनी सांगितलं आहे.त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला अंगणवाडी सेविकांना बोलवण्यावर अजित पवारांनी आक्षेप घेतला असून ही खूप गंभीर बाब असल्याचं सांगितलं आहे. त्याचबरोबर आजपर्यंत जिल्ह्याला पालकमंत्री नेमले गेले नाहीत, ही खूप गंभीर बाब आहे. जर पालकमंत्री नेमले गेले नाही तर पैसे कसे खर्च करणार? असा सवाल विरोधीपक्षनेत्यांनी केला आहे. राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय नेत्यांनी बोलण अपेक्षित असतं. त्यामुळे त्याठिकाणी मी बोलणं टाळलं. कालच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी देशभरातून नेते आले होते. त्यांना बोलायला वेळ हवा होतो म्हणून मी ती भूमिका घेतली. मी वॉशरूमला गेलो होतो पण लोकांनी वेगळा अर्थ काढला आणि उगाच मी नाराज असल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या. असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी कालच्या अधिवेशनात नाराज असल्याच्या चर्चेवर दिलं आहे.