वडवणी तहसिल समोर पुन्हा श्रीमंत मुंडेंचे अमरण उपोषण
वडवणी (रिपोर्टर):- वडवणी येथील विविध विकास कामाच्या अश्वासन देवून एक महिना लोटला तरी हि कार्यवाही झाली नसल्याने पुन्हा मराठावाडा मुक्ती संग्राम दिनी आज वडवणी तहसिल कार्यालया समोर समाजसेवक श्रीमंत मुंडे यांनी अमरण उपोषणाला सकाळपासून सुरुवात केली आहे.
श्रीमंत मुंडे हे गेल्या 15 आँगस्ट रोजी विविध मागण्यासाठी अमरण उपोषणाला बसले होते.या दरम्यान प्रशासनाने अवश्वासन दिले होते.या अश्वासनावर कुठलीच कार्यवाही न झाल्याने पुन्हा मुंडे हे अमरण उपोषणाला बसले आहेत.यात वडवणी येथे नवीन ग्रामीण रुग्णालय मंजूर झालेले असून जागे अभावी चालू करण्यासाठी अडचणी येत आहेत त्याकरिता सद्यस्थितीमध्ये वडवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथेच ग्रामीण रुग्णालय चालू करण्यात यावे,वडवणी येथे तब्बल सहा वर्षांपासून 108 म्बुलन्स नसल्या कारणाने तात्काळ वडवणी शहर व तालुक्यासाठी म्बुलन्स उपलब्ध करून देण्यात यावी तसेच वडवणी हे तालुक्याचे ठिकाण असून येथे बस स्थानकाचे अद्याप पर्यंत कसल्याही प्रकारची उपलब्धता नाही त्यामुळे सर्वसामान्य जनतेस अत्यंत त्रास होत असून वडवणी येथे बस स्थानकासाठी शासनाकडून जागा उपलब्ध करून देऊन तात्काळ बस स्थानक चालू करण्यात यावी यामागण्यासाठी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी समाजसेवक श्रीमंत मुंडे हे वडवणी तहसिल कार्यालया समोर अमरण उपोषणाला बसले आहेत.यावेळी काँग्रेसचे दादासाहेब मुंडे,युवा नेते धनराज मुंडे,राष्ट्रवादीचे नेते श्रीराम मुंडे,शिवसंग्रामचे सुग्रीव मुंडे,जेष्ठ नेते बाबा मुंडे,उद्योजक बालजी चाटे,प्रा.दादासाहेब जाधवर सर, पत्रकार सतिश मुजमुले,एसएङ्गआयचे लहु खारगे यांच्यासह आदि जण उपस्थित होते.