Thursday, August 5, 2021
No menu items!
Homeकोरोनाराज्यात २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन वाढवला

राज्यात २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन वाढवला

मुंबई (रिपोर्टर):- करोनाच्या प्रसाराला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ठराविक कालावधीनंतर लॉकडाऊनला मुदतवाढ दिली जात असून, राज्य सरकारने पुन्हा एकदा लॉकडाउन वाढवला आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनला सातत्यानं मुदतवाढ दिली जात आहे. राज्य सरकारनं पुन्हा एकदा लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला असून, तसे आदेश आज काढण्यात आले आहेत. २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला असून, आतापर्यंत परवानगी देण्यात आलेल्या सेवा आणि गोष्टींवर सुरू राहणार आहेत. तर ज्या सेवांना परवानगी देण्यात आलेली नाही. त्या पूर्वीप्रमाणेच बंद असणार आहेत. लॉकडाऊन वाढवताना राज्य सरकारनं यापूर्वी वेळोवेळी जारी केलेले आदेश लागू असतील. गेल्या ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबरला मिशन बिगीन अगेन अंतर्गत काही निर्बंध शिथील करण्यात आले होते. यात परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहेत. मात्र, कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन कायम ठेवला जाणार आहे.

बीडमध्ये संसर्ग वाढला; ४३ पॉझिटिव्ह
आरोग्य विभागाला आज तब्बल ९९७ संायितांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये ४३ जण पॉझिटिव्ह तर ९५४ जण निगेटिव्ह आढळून आले आहेत. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई १२, आष्टी ३, बीड १५, गेवराई १, केज ८, परळी २ तर शिरूर आणि वडवणी तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.

मुंबईकरांना मोठा दिलासा!
१ फेब्रुवारीपासून लोकल सेवा होणार सुरू

अनेक महिन्यांपासून लोकल सेवेअभावी हेळसांड होत असलेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना ठाकरे सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. कोविड परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती मात्र १ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही, अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!