माजलगाव (रिपोर्टर) तालुक्यातील बेलोरा येथील व माजलगाव शहरात वास्तव्यास असलेले डॉ. दत्तात्रय श्रीमंतराव फपाळ हे सकाळी सात वाजता माजलगाव धरणामध्ये पोहण्यासाठी गेले मात्र त्यांना दम लागल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यु झाल्याची घटना रविवारी दि. 18 सप्टेंबर 2022 सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान घडली असुन अद्यापही त्यांचा मृतदेहाचा शोध सुरूच आहे.
याबाबत पोलिसांकडुन मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील बेलोरा येथील डॉ. दत्तात्रय श्रीमंतराव फपाळ वय 45 वर्षे यांचे तेलगाव येथे अजिंक्य हॉस्पिटल आहे. ते गेल्या काही दिवसांपासुन माजलगाव येथे वास्तव्यास होते. रोज सकाळी माजलगाव धरणामध्ये पोहण्यासाठी जात होते. दररोजजच्या प्रमाणे रविवारी देखिल तेपोहायला गेले असतांना पोहत पोहत ते लांब गेले. परंतु परतत असतांना त्यांना दम लागल्याने त्यांचा बुडून मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना रविवारी सकाळी घडली आहे. दरम्यान त्यांच्या मृतदेहाचा शोध सुरू असुन बीड येथील बचाव पथकाचे अधिकारी, परळी येथील पथक व स्थानिक मच्छिमार हे शोध घेत आहेत. यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांचेसह तहसिलदार वर्षा मनाळे, शहर पोलिसाचे एपीआय श्री. पालवे व त्यांची टीम घटनास्थळी सकाळपासुनच आहेत. दरम्यान डॉक्टरी पेशा असलेले दत्तात्रयफपाळ यांच्या मृत्युने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.