वडवणी (रिपोर्टर):- वडवणी बाजार समितीच्या अशासकिय प्रशासक म्हणून राष्ट्रवादीचे नेते दिनेश मस्के यांचे पद गेले तर दोन दिवसापुर्वी भाजपाने आणलेल्या अशासकिय प्रशासक मंडळ येण्या आधिच तोंडावर पडले आहे. याठिकाणी शासनाचे सहकार आधिकारी एस.बी.मंगनाळे यांची शासकिय प्रशासक म्हणून नियुक्ती केल्याचे पत्र काढले असुन त्यांनी आज पदभार देखील घेतला आहे.
वडवणी बाजार समितीच्या अशासकिय प्रशासक निवडीवरुन राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची तर भाजपासाठी आस्तित्वाची लढाई मानली जात होती.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते दिनेश मस्के यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती.यात आता राज्यात सत्तातरांच्या घडामोडी घडल्या आणि राष्ट्रवादी सत्तेपासून दूर असल्याने भाजपाने यांचा ङ्गायदा घेत दि.20 संप्टेबर 2022 रोजी पणन संचालक महा.राज्य यांच्याकडून पत्र काढत अशासकिय प्रशासक म्हणून भाजपाचे अशोक अंकुशराव मस्के यांची नियुक्तीचे पत्र काढत सात जण संचालक म्हणून घेतले होते.यात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांनी काढलेल्या आजच्या पत्रात असा आदेश नमूद आहे कि,महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, 1963 चे कलम 15 (अ) (1) (ब) नुसार प्राप्त वैधानिक अधिकारानुसार मी, समृत जाधव, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बोड संदर्भ क्र. (4) आदेशात अंशत: बदल करून कृषि उत्पन्न बाजार समिती, वडवणी या बाजार समितीचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी विद्यमान अशासकीय प्रशासकीय मंडळाऐवजी श्री. एस. बी. मंगनाळे, सहकार अधिकारी श्रेणी-1, संलग्न, सहायक निबंधक, सहकारी संस्था ता. वडवणी यांची प्रशासक म्हणून नियुक्त करीत आहे.असे म्हटले आहे.आज शासकिय प्रशासक म्हणून पदभार देखील देण्यात आला आहे.तर राष्ट्रवादीचे दिनेश मस्के यांचे पद गेले तर भाजपाने सत्तेचा ङ्गायदा घेत नवानियुक्त केलेले अशासकिय प्रशासकिय मंडळ येण्या आधिच तोंडावर पडले असल्याचे यावरुन दिसून येत आहे.