वडवणी (रिपोर्टर):- वडवणी शहरासह तालुक्यात व्हायर इन्फेक्शन आजाराने डोके वर काढले असून प्रत्येक गांवा-गांवात रुग्ण आढळून येत आसतानाच आज पिंपरखेड येथील पाच वर्षीय चमकुलीचा डेंग्यू आजाराने उपचारा दरम्यान दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत आरोग्यासह ग्रामपंचायतीचे स्थानिक प्रशासन देखील याला जबाबदार असल्याच नागरिकांमधून बोलल जात आहे.
याबाबत आधिक माहिती अशी कि,वडवणी शहरासह तालुक्यात ताप,सर्दी,खोकला,अंगदुख यासारख्या व्हायरल इन्फेक्शन आजाराने थैमान घातले असून पिंपरखेड येथील शाम भगवान साबळे यांची एकुलती एक चिमकुली वेदिका साबळे या पाच वर्षीय चिमकुलील १० दिवसांपुर्वी आजाराने ग्रासले म्हणून शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु उपचाराला प्रतिसाद न दिल्यामुळे बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर तपासणी अंती डेंग्यू आजाराचे निदान झाले आसता सहा दिवस तब्बल डाँक्टराच्या शर्यती उपचाराला साथ न देता आज वेदिका या चिमकुलीचा डेंग्यू आजाराने दुदैवी मुत्यू झाल्याची घटना घडली हि वार्ता पिंपरखेड परिसरासह तालुक्यात वाऱ्यासारखी परसली तेव्हा प्रत्येकजण हळहळ व्यक्त करत होता.तर पिंपरखेड गांवात अनेक रुग्ण डेंग्यू आजाराने ग्रासले असल्याची माहिती गांवकऱ्यांनी दिली असून इतर तालुक्यात देखील या आजाराने डोकेवर काढले आहे.तालुका आरोग्य विभागाला यांचे ना देणे आहे ना घेणे अशी परस्थिती दिसून येत आहे.याला ग्रामपंचायत स्तरावरील प्रशासन देखील जबाबदार आहे.गांवात अस्वच्छाता,रस्त्यावर पाण्याचे डबके,मच्छर सह आदि प्रश्नानी ग्रासले असल्याने यातूनच डेंग्यू सारखे आजार फोफावले असल्याचे बोलले जात आसल्याने आरोग्य प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
डेंग्यूच होणार नाही यांची काळजी घ्या – शाम साबळे
माझी मुलीचा डेंग्यू आजाराने घात केला आहे.आता तरी गांवातील नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच आरोग्य आणि स्थानिक ग्रा.पं.प्रशासनाने उपाय योजना सोबतच जनजागृती करणे आवश्यक आहे.यांचे उपाय देखील गांवकऱ्यांनी पाळणे आवश्यक आहे.आमची वेदिका चिमकुली तर गेली परंतु दुसऱ्याच लेकरावर अशा प्रसंग येऊ नये म्हणून डेंग्यूची लक्षणे वेळीच ओळखा,योग्य उपचार घ्यावे अशी प्रतिक्रिया वेदिकाचे वडिल शाम साबळे यांनी दिली आहे.