वडवणी (रिपोर्टर):- शेतात राबराब राबत कबाड कष्ट करुन पिकविलेले धान वरुण राजाच्या अवकृपेनी नास्ताधूस झाले,पिक विमा मिळेना अशात कसं जगायच,घेतलेले कर्ज कशाच्या पायी फेडायच म्हणून चिंचवडगांव (राम नगर ) येथील 55 वर्षीय शेतकऱ्याने काल शेतात विष पाषण केले आहे.सदरील शेतकऱ्याचा आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उपचारा दरम्यान बीड येथील शासकिय हाँस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान दुदैवी मृत्यू झाला आहे.
निवृत्ती रामचंद्र चाळक असं आत्महात्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.त्यांना पाच एकर शेती चिंचवडगांव शिवारात आहे.शेतामध्ये सोयाबीन,कापूस सह अन्य पिक घेतले होते.परंतु मागील काही दिवसांत वरुण राजाच्या अवकृपेने सोयाबीन आणि कापूस पिक पाण्याने धूवून गेले आहे.यात प्रशासनाचा वेळकाडूपणा,पिक विमा मिळेना यात कुंटुब प्रपचासाठी घेतलेले शासकिय बँकासह खाजगी बँकेकडून घेतलेले कर्ज कशाच्या पायी फेडायचे म्हणून नैराश्य आले यात काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शेतात गेले आणि तिथेच निवृत्त चाळक यांनी विष पाषाण केले हि घटना शेजारील शेतकऱ्याच्या लक्षात येताच अन्य जणांना बोलावून उपारासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात नेले उपचाराला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने आज सकाळी सहा वजण्याच्या सुमारास निवृत्ती चाळक यांची प्राणज्योत मालवली असून त्यांच्याकडे शासकिय आणि खाजगी बँकेचे असे एकुण 12 ते 14 लाख रुपयाचे कर्ज असल्याचे सांगितल जात आहे.असून त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलं,एक मुलगी सह सुन्ना,जावाई,नाती,नातवंड असा परिवार आहे.तर एक मुलगा पोटाची खळगी भरण्यासाठी पुणे येथे काही दिवसांपुर्वीच गेला होता.तर सरकार गर्दीवर वावरत आहे. प्रशासन देखील वेळकाडूपणा काढत शेतकरी राजाकडे कायमच दुर्लक्ष केलं जात असल्याने जगाचा पोंशिदा मसणवाट्याला जवळ करत असून शासन-प्रशासन, लोकाहो उघडा डोळे,वाचा निट आणि शेतकऱ्याची परस्थीथिती जाणून घेत ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.