Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeबीडआरटीई पोर्टलवर इंग्रजी शाळा नोंदणीसाठी मुदतवाढ

आरटीई पोर्टलवर इंग्रजी शाळा नोंदणीसाठी मुदतवाढ

शाळा नोंदणी नंतर पालकांना अर्ज करता येणार – मनोज जाधव
बीड (रिपोर्टर)-शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिकदृष्ट्‌या दुर्बल ,वंचित , दिव्यांग घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळेत प्रवेश मिळावा याकरिता एकूण प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात . पात्र विद्यार्थ्यांना २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश देण्यासाठी खासगी शाळांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे .त्या संदर्भातील मार्गदर्शक सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आल्या होत्या.त्यानुसार शाळा नोंदणीसाठी ८ फेब्रुवारी अशी अंतिम मुदत होती . त्या नंतर दि १० आणि आता १५ फेब्रुवारीपर्यंत दुसर्‍यांदा मुदतवाढ मिळाली असून बीड जिल्ह्यात १४ फेब्रुवारी सकाळ पर्यंत १५८ शाळांची नोंदणी झाली आहे. गत वर्षी जिल्ह्यात २२९ शाळांच्या नोंदी आरटीई पोर्टलवर झाल्या होत्या. शाळा नोंदणी पूर्ण झाल्या नंतर पालकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करता येतील. असे शिवसंग्रामचे नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी म्हंटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!