बीड (रिपोर्टर)ः-पिक विमा कंपनी नफेखोर आहे. शेतकरी पुत्रांनी जागृत होवून आपल्या झालेल्या पिकांची वेळीच तक्रार करावी यासह इतर माहिती संदर्भात आज एकाच दिवशी शंभर गावात पिक विमा जनजागृती अभियान राबवण्यात आले. या अभियानात शेतकरी पुत्रांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. हे अनोखे अभियान धनंजय गुंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले.
जास्तीत जास्त शेतकर्यांनी पिकविमा नुकसान तक्रार नोंदवण्यासाठी सर्वांना माहिती द्यावी, रिजेक्ट झालेल्या शेतकर्यांना ते रिजेक्ट झाल्याची माहिती देणे व पुन्हा त्यांना तक्रार करण्यास सांगणे, क्रॉप इन्युरन्स अॅपवर नोंदणी करता न येणार्या शेतकर्यांना नोंदणी करुन दाखवणे. ज्यांना मोबाईल हाताळता येत नाही अशा शेतकर्यांची तक्रार करुन देणे, पिक विमा बाबत तक्रार, पंचनामा, तक्रार पेंडींग कसे दाखवते, रिजेक्ट कसे होते याबाबत तांत्रीक माहिती शेतकर्यांना देणे, 72 तासाच्या आत तक्रार कशी नोंदणी करावी याबाबत माहिती देणे, पिक पाहणी बाबत सर्वांना नोंदणी करायला सांगणे, यासाठी आज शंभर गावामध्ये जनजागृती अभियान राबवण्यात आले. यात पिंपळादेवी, पोथरा, खापरपांगरी, काळेगांव, कुंंभारी, पालवण, खडकीघाट, दगडी शाहजानपूर, भवानवाडी, चौसाळा, वलीपूर, घाटजवळा सह आदि गावातील शेतकरी पुत्रांनी या अभियानामध्ये सहभाग घेतला होता.