Monday, March 8, 2021
No menu items!
Home राजकारण मंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ भाजपाच्या सरपंचाने दिला राजीनामा

मंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ भाजपाच्या सरपंचाने दिला राजीनामा

अंबाजोगाईतील काळवटीचे सरपंच म्हणतात, भाजप ओबीसींचे नेतृत्व संपवत आहे

बीड (रिपोर्टर):- पूजा चव्हाण या तरुणीच्या कथित आत्महत्या प्रकरणात संशयाच्या फेर्‍यात अडकलेले संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत दोन गट पडल्याचं सांगण्यात येतंय. तसंच, राठोड यांच्या समर्थनार्थ राज्यात अनेक जण पुढे येत आहेत. अशातच भाजपच्या सरपंचानं संजय राठोड यांचं समर्थन करत पक्षाचा राजीनामा दिला आहे.
पूजा चव्हाण ही तरुणी मुळची बीड जिल्ह्यातील असून तीनं पुण्यात आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. पूजाच्या आत्महत्येला ठाकरे सरकारमधील एक मंत्री जबाबदार असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. तर, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेचे नेते व वनमंत्री संजय राठोड यांचं थेट नाव घेऊन आरोप केला आहे. तसंच, सोशल मीडियावर या प्रकरणी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपनं राठोड यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. मात्र, दुसरीकडे बंजारा समाज संजय राठोड यांच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यातील काळवटी तांडा या गावच्या सरपंचानं भाजपवर गंभीर आरोप करत पक्षाचा राजीनामा दिला आहे.
सरपंच कमल नाथराव चव्हाण असं या सरपंचाचं नाव असून त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. तसंच, वनमंत्री संजय राठोड यांचं समर्थनही केलं आहे.

काय आहे राजीनामा पत्रात…
’मी कमल नाथराव चव्हाण, काळवटी, ता. अंबाजोगाई, जि. बीड येथील सरपंच म्हणून मी माझ्या भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देत असून त्याचा स्वीकार करण्यात यावा. राजीनाम्याचे कारण म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भाजपा पक्षातील नेते वेळोवेळी महाराष्ट्रातील ओबीसी नेतृत्व व बंजारा समाजातील उच्च पदस्थ लोकनेते संजय राठोड यांना संपवण्याचे कटकारस्थान करत असल्याचं मला जाणवत आहे,’ असा आरोप कमल चव्हाण यांनी केला आहे.

Most Popular

पांगरबावडी जवळ भिषण अपघात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

पांगरबावडी जवळ भिषण अपघातएकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यूपाच गंभीर, मृतामध्ये दोन चिमुकल्यांचा समावेशबीड । रिपोर्टरवडवणी कडून बीडकडे येणार्‍या रिक्षाला ट्रकणे जोराची धडक...

पुजा चव्हाणच्या बहिणीचा मोबाइल पळविला परळी शहरात घडली घटना

परळी (रिपोर्टर)- तुझ्या बहिणीबद्दल बोलायचे आहे, असे सांगून पुजा चव्हाणच्या बहिणला बोलावून घेत तोंडाला स्कार्फ बांधलेल्या एका तरुणीने मोबाईल हिसकावून घेत पळ...

सराफाला लुटणारी टोळी गजाआड

चोरीचे सोने घेणार्‍या सराफाच्याही आवळल्या मुसक्यादैठण फाट्यावर भरदिवसा घडली होती घटनाबीड (रिपोर्टर)- मिरगावचा बाजार करून गेवराईकडे परतणार्‍या एका सराफाला दैठण फाट्याजवळ अडवून...

परमिट एकाचे, माल दुसर्‍याकडे ! बोरफडीच्या ग्रामस्थांनी अडवला टेम्पो

तहसीलदारासह पुरवठा विभागाचे संगनमत उघडग्रामस्थांनाच धमकावलं तहसीलदारांनीखमक्या ग्रामस्थांमुळे काळाबाजार थांबलाबीड (रिपोर्टर)- पुरवठा विभागाच्या संगनमताने जिल्ह्यात राशनवरील धान्याचा सर्रासपणे काळाबाजार होत असल्याचे समोर...