आष्टी ( रिपोर्टर ):-तालुक्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असुन काल दि.13 रोजी पांढरी आष्टा,आष्टी परिसरातील गावात ढगफुटी होऊन नद्या नाल्यांना पुरपरस्थिती निर्माण झाली आहे.गावेची गावे जलमय झाली आहेत.अतोनात शेतकर्यांचे नुकसान झाले आहे.आज पुन्हा याच परिसरात दुपारी 11 वाजेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाटामुळे शेतकर्यांचे धाबे दणाणले.तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन काढणीचे कामे सुरू आहेत. या सर्व पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. सोयाबीन पिकाला सर्वाधिक या पावसाचा फटका बसला आहे.
आष्टी तालुक्यात पावसाने आपला उपद्रव सुरू केला आहे. धरणांची पाणी पातळी ओव्हर फ्लो झाली आहे, मात्र आता पडणारा पावसाने थेट शेती उत्पादनाला फटका बसत आहे.सोयाबीन पीक पूर्ण परिपक्व झाले आहेत. आता हे पीक शेतात ठेवल्याने सोयाबीन जास्त पावसामुळे कोंब येऊ लागले आहेत. त्यामुळे हातात आलेले पीक कुजून जाण्याची भीती आहे.परतीचा पाऊस पाठ सोडायला तयार नाही बळीराजाच्या मुळावर हा पाऊस येत असून सर्व परिसर जलमय झाले आहे.शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.काल दि.13 रोजी ढगफुटी झाली आज पुन्हा दुपारी 11 वाजेपासून विजेच्या कडकडाटासह जोरदार ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातले आहे.दुपारी 1 वाजेपर्यंत ही पावसाचा जोर कमी झाला नव्हता.