Friday, May 20, 2022
No menu items!
Homeसंपादकीयरोखठोक - अटल वाक्य, ‘‘न भीतो...

रोखठोक – अटल वाक्य, ‘‘न भीतो मरणादस्मि केवलम् दूषितो यश’’ हाच का राजधर्म ?

सत्ताकारणाने पछाडलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सत्तालोभातून उडत असलेला धुराळा गेल्या काही वर्षापासून थांबण्याचे नाव घेत नाही. लोकांच्या मुलभूत प्रश्‍नाकडे प्रकर्षाने लक्ष देण्यापेक्षा लोकांचे मुलभूत प्रश्‍न मांडणार्‍यांना द्वेष भावनेतून देण्यात येत असलेली वागणुक  हेच लोभीसत्ताकारणाचे ध्येय आहे काय? काय चालुय सध्या देशात? लोकहितवादाचे राजकारण की सत्ता पिपासुंचे धर्मकारण? असे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित होण्याचे कारणच तेवढे की जेंव्हा-जेंव्हा या देशातला तरूण, या देशातला कष्टकरी, कामगार, शेतकरी सर्व सामान्य माणुस सरकारला प्रश्‍न विचारतो, सवाल विचारतो तेंव्हा-तेंव्हा सरकारकडून ज्या पद्धतीने मुळ प्रश्‍नांना बगल देत प्रश्‍न विचारणार्‍यांना सवाल उपस्थित करणार्‍यांना देशद्रोह्याच्या कठाड्यात उभे केले जाते. याचे एक नव्हे, दोन नव्हे भारतीय जनता पार्टीच्या सत्ताकाळात शेकडो उदाहरणे तुम्हा,आम्हास पहावयास मिळत आहेत. लोकांच्या मुलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा इथपर्यंत राहिल्या नाहीत तर आता लोकांच्या गरजा या नोकर्‍या आहेत, महागाई आहे, चांगले शिक्षण आहे, आरोग्य सुविधा आहेत परंतू या प्रमुख मुलभूत गोष्टींकडे जे समुळ दुर्लक्ष केलं जातय आणि जात, पात, धर्म, पंत एवढ्यावरच राजकारण केलं जातय हे देशाच्या अधोगतीचं लक्षण म्हणावं लागेल. इंग्रजांनी जात, पात, धर्म, पंताच्या नावावर फोडा आणि तोडाचं राजकारण केलं आणि या देशावर शेकडो वर्ष राजकारण केलं त्याच पद्धतीने आज अखंड भारतात जात, पात, धर्म, पंताच्या नावावर राजकारण केलं जातय. यातून लोकांचे, तरूणांचे प्रश्‍न सुटत नाहीत तर ते आणखी जटील होवून बसत आहेत. ज्या वेळेस सरकार राजधर्म पाळत नाही त्यावेळेस सत्ताधार्‍यांना राजधर्म पाळण्याइरादे स्वयंस्फुर्तीने लोक रस्त्यावर येतात, त्यांच्या चुका काढतात, सरकार विरोधात बोलतात तेंव्हा सरकारने मोठ्या मनाने, स्वत:च्या चुका स्विकारायला हव्यात मात्र इथं चुका स्विकारणे तर सोडा चुका काढणाराच आरोपीच्या उभा केला जातो आणि हे सर्व धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात होते तेंव्हा यथा राजा, तथा प्रजा असे म्हणावेसे वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदी तेच आहेत जे की अखंड हिंदुस्तानात ज्यांच्याकडे अजातशत्रु म्हणून पाहिलं जातं ते तत्कालीन पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान मोदींना कधी काळी राजधर्म पाळण्याचे सांगितले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची भाजप आज राजधर्म पाळतेय का? असा प्रश्‍न जेंव्हा उपस्थित होईल तेंव्हा आजपर्यंतच्या कार्यप्रणालीवर ते राजधर्म स्पेशल पाळत नाहीत असे स्पष्टपणे दिसून येईल. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे
अटल वाक्य
ची जेंव्हा-जेंव्हा आठवण येते तेंव्हा-तेंव्हा आज सत्तेत असलेली भाजपा ही खरच त्याच विचारावर चालणारी भाजपा आहे का? ज्या अटल बिहारींचे विचार इंसान बनो, केवल नामसे नही, रूपसे नही,  शक्लसे नही, हृदयसे, बुद्धीसे, सरकारसे, जानसे माणसाने कसं बनावं, कस रहावं आणि माणसातला माणुस कसा असावा हे या वाक्यात वाजपेयीजींनी आपल्याला सांगुन टाकलयं. छोटे मन से कोई बडा नही होता, टुटे मन से कोई खडा नही होता या वाक्यातला सार पाहिला तर आजच्या राज्यकर्त्यांविरोधात सनसनीत चपराक असेल. विरोध करणार्‍यांना देशद्रोही ठरू पाहणार्‍यांचं मन किती छोटं आहे आणि तुटल्या मनाने ज्या लोकांवर आरोप होत आहेत ते जर विद्यार्थी जगतातील असतील तर ते उभे राहणार नाहीत आणि त्यातूनच देशाचे भविष्य हे अंधारमय होईल हेही स्पष्ट होते. हम अहिंसा मे आस्था रखते हैं और चाहते है की विश्‍व के संघर्षोका समाधान. शांती आणि समजोते के मार्ग से हो. आज त्याच वाजपेयीजींच्या भाजपात समजोताचा प्रश्‍नच येत नाही. लोक आंदोलन करत असतील तर ते आंदोलन मोडायचे कसे? त्यांच्या रस्त्यात खिळे मारायचे कसे? हे आजच्या राज्यकर्त्यांचे काम उभ्या देशाने पाहिले आहे. मनुष्य-मनुष्यय के संबंध अच्छे रहे सांप्रदायीक सद्भाव रहे, मजहब का शोषन न किया जाय, जाती के आधारपर लोको के हिनभावना को उत्तेजीत न किया जाय, इतमें कोई मतभेद नही हैं हे वाजपेयीजींनी सांगितले परंतू त्याच वाजपेयीजींच्या इहलोकांनंतर भाजपात देशाचं नेतृत्व करणारे पंतप्रधानच जर एखाद्या आंदोलनाला त्यांच्या कपड्यावरून उभ्या देशाला ओळख ठरवून देत असतील तर त्याच पेक्षा दुर्दैव ते काय असेल? पुढे अटलबिहारी वाजपेयी अगदी स्पष्टपणे एक प्रकारे मांडतात अगर परमात्मा भी आ जाये, और कहे की छुतअछुत मानो तो मै ऐसे परमात्मा को भी मै मानने को तयार नही. हुं किंतु परमात्मा ऐसा कह ही नही सकता. अटल बिहारी वाजपेयी जात, पात, धर्म, पंताला महत्त्व देत नव्हते. छुतअच्छुतला महत्त्व देत नव्हते परंतू गेल्या सहा  वर्षाच्या कालखंडात भारतीय जनता पार्टीच्या सरकारने जात, पात, धर्म, पंताचं राजकारण केलं आणि करत आहेत असा सरळ-सरळ आरोप देशभरातून केला जातो. आणि या आरोपाचं खंडणही सरकारकडून केलं जात नाही. मानव और मानव के बिचमें जो भेद की दिवार खडी है उनको डहाणा होना. इसके लिए एक राष्ट्रीय अभियान की आवश्यकता हैं असही अटलजींनी म्हटलं होतं. माणसा माणसातला भेद दूर करण्याचे आद्य कर्तव्य हे विद्यमान केंद्र सरकारचे असायला हवे होते. मात्र हथे माणसामाणसात भेद निर्माण कसे होतील? असे वक्तव्य खुद्द दस्तुरखुद्द पंतप्रधानांकडून केले जातात. कधी कपड्यांवरून व्यक्तीची ओळख देशाला करून देता येते, कधी आंदोलकांना आंदोलनजिवी परावजीवी संबोधले जाते. तेंव्हा अटल बिहारींचे संस्कार आणि भाजपाची बदललेली संस्कृती ही पक्षाला बदनाम करणारी तर नाही ना? पक्षाचं सोडा परंतू देशाला नक्कीच बदनाम करणारी म्हणावी लागेल.
न भितो मरणादस्मि
केवलम् दूषितो यश!
प्रभु रामचंद्राने म्हटले होते, मी मृत्यूला भित नाही, जर मी भित असेल तर बदनामीला भितो. लोक अपवादाला भितो असं म्हणत स्व.वाजपेयी यांनी संसदेत भाषण करतांना 40 वर्षाची माझी राजकीय जीवन एक खुली किताब आहे. परंतू जनतेने जेंव्हा भारतीय जनता पार्टीला सर्वात मोठा पक्ष म्हणून समर्थन दिलं आहे तेंव्हा जनतेची आवायदना झाली पाहिजे का? असे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित करत अटलजींनी तेंव्हा सत्य-असत्यावर प्रकाश टाकला होता. आजही भारतीय जनता पार्टीला सर्वात मोठा पक्ष म्हणून देशवासियांनी समर्थन दिलं आहे. या समर्थनाचा आदर करण्याचे सोडून भाजपा सरकारकडून ज्या पद्धतीने देशातल्या विविध घटकांचा पावलो पावली अपमान केला जातो तेंव्हा न भीतो मरणादस्मि केवलम् दूषितो यश या प्रभु रामांच्या वाक्याचा अनादर प्रभु रामाचे नाव घेणारेच करत तर नाही ना? हा प्रश्‍न उपस्थित राहिलच. शेतकर्‍याचं आंदोलन आणि त्या आंदोलनाकडे सातत्याने होणारं दुर्लक्ष पाहिलं तर मुह मे राम, बगल में छुरी चेच ध्येय धोरण केंद्र सरकारचे आहे असा सरळ आरोप आंदोलकांबरोबर देशातल्या विविध घटकांकडून केला जातो आणि त्या आरोपात तथ्य ही असते ते केवळ सरकारच्या कार्यप्रणालीमुळेच गेल्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये सरकारला सवाल विचारणार्‍या लोकांवर ज्या पद्धतीने देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले ते स्वतंत्र भारताच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कधीच झाले नाहीत. देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणं अथवा सवाल विचारणार्‍यांना बंदीवानात धाडणं हे जर सरकारचं आद्य कर्तव्य असेल तर हे सरकार हुकूमशाहीच्या पावलावर पाऊल टाकतय असं म्हणायला नक्कीच वाव आहे. आता
टुल कीटचं
प्रकरण चांगलच वाजतय, खर पाहिलं तर एखाद्या सरकारवर सातत्याने एखादा आरोप होत असेल तर त्या सरकारचा प्रयत्न ते आरोप चुकीचे कसे आहेत हे दाखवण्याचा असतो. त्या दिशेने सरकार पावले टाकत असते. आपल्यावर होत असलेल्या आरोपाचं खंडण करण्यासाठी प्रकर्षाने ते बाहेर पडत असते. पाऊलं टाकत नसले तरी तस भासवण्याचा प्रयत्न केला जात असतो. परंतू केंद्रातील विद्यमान सरकारची निती वेगळीच दिसून येते.  सरकारला जी दुषणे दिली जातात ती सरकारसाठी भुषाणव आहेत असं तर सरकारला वाटत नाही. गेल्या तीन महिन्यापासून दिल्लीच्या सिमेवर सुरू असलेलं शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने सरकारच्या लोकशाहीच विसंगत कार्यपद्धतीवर सर्वस्तरातून ज्या टिका होत आहेत त्या पाहिल्या आणि सरकारची भूमिका, सरकारचा अडेलतटुपणा पाहिला तर नक्कीच सरकारला हा सुर्य आणि हा जयजरथ दाखवणारा व्यक्ती आवडत नाही हे यातून स्पष्ट होते. 26 जानेवारीला दिल्लीत आंदोलन झाले. स्वीडन मधील पर्यावरणवादी ग्रेटा थंगबर्गनने पाठींबा दिला, तिला जे टुल कीट दिले गेले ते बनवतांना परदेशातील विशेषत: खलीस्तानवादी शक्तीची मदत घेण्यात आली अशी माहिती समोर आल्याचा दावा दिल्ली पोलीसांनी केला. व्हाटसअ‍ॅपद्वारे सरकारविरोधात गैरसमज असंतोष पसरवण्याचा परदेशातील भारतीय वकीलातींना धक्का पोहचवण्याचा कट केला अशा अनेक विविध बाबी समोर आल्याचा दावा पोलीस करत आहेत. ग्रेटा थंगबर्गसारख्या शाळकरी मुलीने फ्रायडेज् फॉर फ्युचर ही चळवळ सुरू केली. तिच्या भारतातील संस्थानपैकी एक म्हणजे दिशा रवी गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये या चलवळीची वेबसाईट दिल्ली पोलीसांनी ब्लॉक केली होती, सदस्यांना नोटीसा पाठवल्या होत्या. देशाच्या सार्वभौमतेला, शांततेला आणि एकात्मतेला धोका निर्माण केल्याचा आरोप लावला होता तरीही संघटनेचे काम सुरू होते. दिशा रवी प्रकरणात ज्या प्रकारे पोलीसांनी कारवाई केली, देशद्रोहासारखे गंभीर आरोप लावले ते पाहता नक्कीच चिंता वाटावी. लोकशाही मार्गाने कोणत्याही देशात सत्तेवर आलेल्या सरकारला उलथवण्यासाठी कटकारस्थाने रचणे गैरच. तो अक्षम्य गुन्हाच हेही आम्ही मानतो परंतू सवाल विचारणे, आंदोलन करणे, याला जर देशद्रोह म्हटलं जात असेल तर देश नेमका कुठल्या दिशेने जातोय. टुल कीट प्रकरणात ज्या विद्यार्थ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत त्या
विद्यार्थ्यांचे भविष्य काय?
बीहमधील शंतनु शिवलाल मुळुक याच्या विरोधातही टुल कीट प्रकरणात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झालाय. तो पर्यावरणप्रेमी आहे, त्याने शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला म्हणून त्याच्यावर हा गुन्हा दाखल आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीन घेतांना स्वत: शंतनु कोर्टात म्हणाला, आम्ही केवळ आपल्या उपजिविकेसाठी लढणार्‍या शेतकर्‍यांचे समर्थन करत  होतो परंतू आमच्या सुट उगवला जातोय. असा सुड म्हणजे सत्तेचा काळा चेहरा आहे, हे केवळ लोकशाहीला बाधक ठरणारे नव्हे तर मुलभूत मानवी हक्काचे टुल कीट आहे. देशद्रोही असल्याचा हा भयंकर डाग माझ्या उर्वरित जीवनासह कुटुंबियासाठी विनाशकारी ठरेल. शंतनुची आईही त्याचे समर्थन करतेय. आम्ही शेतकरी आहोत, शेतकर्‍यांच्या आंदोलनाला आम्ही पाठींबा देणारच, वडिलांचीही तीच भूमिका आणि बीह जिल्ह्यातील लोकांनीही शंतनु हा शेतकर्‍याला पाठींबा देतोय या भावनेने त्याच्या पाठीशी आहेत. परंतू आजचे भारतातले सत्ताधिश ज्या पद्धतीने सवाल विचारणार्‍यांचे तोंड दाबतात, सवाल उपस्थित करणार्‍यांचे हात बांधतात, पत्रकारांच्या लेखण्या, त्यांचे विचार दाबण्याचा प्रयत्न करतात आणि हम करेसो कायदा या भूमिकेवर ठाम राहतात. यातून देशाचं भविष्य असणार्‍या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं काय होणार? ही चिंता नक्कीच सतावणारी आहे. प्रभु रामचंद्र म्हणाले की, मी मरणाला भित नाही बदनामीला भितो. त्याच भूमिकेत स्व.अटल बिहारी वाजपेयी राहिले. त्याच वाजपेयीजींनी आजच्या राज्यकर्त्यांना राजधर्म पाळण्याचा कानमंत्र दिला मात्र तो राजधर्म आजही पाळला जातोय याच शंकाच. 

Most Popular

error: Content is protected !!