शेतकऱ्यांवर आभाळ कोसळल धाय मोकलून रडण्याची वेळ तात्काळ सरसकट पंचनामे न करता मदतीची केली मागणी
आष्टी ( रिपोर्टर ):- आष्टी तालुक्यातील आष्टा व आष्टी, महसूल मंडळातील अनेक गावांना गुरुवारी दि.१३ राजी सकाळपासूनच वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. यामुळे या परिसरातील नद्या, लहान मोठे नाले, ओढे तुडूंब भरून वाहिले असून, काही ठिकाणी ढगफुटी झाली शेतकऱ्यांच्या जमिनी खोदल्या गेल्या काढणीला आलेले पिके पाण्यात आहेत काही ठिकाणी पुल तुटले वाहतूक ठप्प होती.शेतक-यांवर ऐन सणासुदीच्या काळात आस्मानी संकट ओढावले आहे.या ढगफुटी व पुरपरिस्थितीची मा.आ.भिमरावजी धोंडे यांनी शुक्रवारी दि.१४ रोजी सकाळी पाहणी करून पुरामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला व स्पाॅट वरुन पालकमंत्री अतुलजी सावे यांना फोन करून नुकसान झालेल्या भागाची माहिती देत तात्काळ बळीराजावर आभाळ कोसळल आहे.धाय मोकलून रडण्याची वेळ आहे.पंचनामे न करता सरसकट मदत करण्याची मागणी केली व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले तालुक्यात मागिल १५ दिवसांपासून परतीचा पाऊस जोरदार होत असून या पावसाने परिसरातील नद्या नाल्यांना मोठा पूर आला आहे. तर वादळी वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून, सोलेवाडी येथील पुल वाहून गेला अहमदनगर बीड महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.पांढरी परीसरात व आष्टा महसूल मंडळात तसेच आजुबाच्या गावांना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे.शेतीचे मोठे नुकसान झाले असून, पेरण्या केलेले बियाणे, ठिबक संच, शेती साहित्य वाहून गेले तर अनेक ठिकाणी वळणे फुटल्याने जमिन खंगाळुन निघाल्या आहे. सोलेवाडी चा पुल तुटला व खंडु झगडे या शेतकऱ्याच्या ४ हजार कोंबड्या वाहून गेल्याने ७ ते ८ लाख रुपयांचे नुकसान झाले,अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले या भागाची चिखल तुडवत मा आ.भिमरावजी धोंडे यांनी पाहणी करत पालकमंत्री अतुलजी सावे यांना फोन वरून परिस्थितीचा आढावा दिला व नुकसान भरपाई आर्थिक मदत मिळण्याची मागणी केली व शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन देत धिर दिला यावेळी अॅड.रत्नदिप निकाळजे,सरपंच राहुल जगताप पिंटू झगडे शरद झगडे भाऊसाहेब झगडे बंडू माने आसाराम झगडे हनुमान झगडे उत्तम झगडे दिनकर वाल्हेकर नारायण झगडे खंडू झगडे राजू झगडे शहाजी झगडे रोहिदास झगडे प्रकाश सोले बंडू सोले दीपक सोले रामा झगडे दिलीप सोले, श्रीमंत माने सतीश माने आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.