पुणे (रिपोर्टर) पुण्यातील वारजे परिसरात जिवंत काडतुसे आढळल्याने खळबळ उडाली आहे. जिवंत काडतुसे यांच्याबरोबर धारधार शास्त्र देखील आढळून आली आहेत. पुणे महापालिकेत काम करणार्या कर्मचार्यांना नाले साफ करताना ही जिवंत काडतुसे आणि शस्त्राने भरलेली पिशवी आढळली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पाटोळे हे पुणे महानगरपालिकेमध्ये आरोग्य (घनकचरा) विभागामध्ये मुकादम म्हणून कार्यरत आहेत. काल सकाळी 7 वाजता ते त्यांच्या सहा कर्मचार्यांसोबत पुणे बैंगलोर हायवे जवळील पॉप्युलर नगर समोरील नाल्यामधील कचरा काढण्याचे काम करीत असताना एका पिशवीमध्ये धारधार शस्त्रे व अग्निशस्त्रांची (बंदूक) 15 जिवंत काडतूसे आढळली.