बीड (रिपोर्टर)- काल नवगण राजुरी येथील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या गळ्यातील अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन दीड तोळ्याचे गंठण लंपास केल्याची घटना घडली असून या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोदावरी परमेश्वर फिरंगे (वय ६७ वर्षे, रा. शाहूनगर, रानुमाता मंदिर, बीड) ह्या काल नवगण राजुरी येथे गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. दर्शन घेताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मिनी गंठण चोरून नेले. त्याची किंमत ५० हजार रुपये आहे. या प्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रोकडे हे करत आहेत.