बीड (रिपोर्टर) शहरातील भक्ती कन्स्ट्रक्शनच्या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. गटाराचे घाण पाणी रस्त्यावर येत आहे. याच घाण पाण्यातून नागरिकांना वाट काढत जावे लागते. मोठमोठ्या खड्यांमुळे येथील रहिवाशांना मणक्याचे आजार होवू लागले आहेत. त्यामुळे हा रस्ता तात्काळ करून घ्यावा अशी मागणी होत आहे.
शहरातील काही भागातील गल्लीबोळातील रस्ते दर्जेदार करण्यात आले आहे. मात्र मोठ्या संख्येने असलेले रहिवाशी भक्ती कन्स्ट्रक्शन येथील मुख्य रस्ता गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. शहरात राहून ग्रामीण भागातही अशा अडचणी नाहीत त्या येथील नागरिकांना भोगाव्या लागतात. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या कडेला नाली नसल्याने गटाराचे घाण पाणी रस्त्यावर येते. याच पाण्यातून नागरिकांना वाट काढत जावे लागते. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाविरोधात नागरिक येथील रहिवाशात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. वारंवार येथील नागरिकांनीही रस्ता करण्याची मागणी करूनही हा रस्ता जाणिवपूर्वक केला जात नसल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहे.