Monday, April 19, 2021
No menu items!
Home बीड जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढला ९५ रुग्ण पॉझिटिव्ह

जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढला ९५ रुग्ण पॉझिटिव्ह

सर्वाधिक बीडचे ३८
बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यामध्ये कोविडच्या रुग्णांची संख्या मध्यंतरी कमी झाली होती. मात्र आता पुन्हा कोविडने डोके वर काढले. काल ५७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. आज मात्र यामध्ये मोठी वाढ झाली आहे. ८२० संशयितांचे स्वॅब तपासण्यात आले. यात ९५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. सर्वाधिक बीडमध्ये ३८ रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने सतर्कता बाळगण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. बाहेर फिरताना मास्क वापरणे सक्तीचे केले आहे. जे नागरिक मास्क वापरणार नाहीत त्यांना दंडात्मक कारवाई करण्याची सूचना पोलिस आणि नगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत. काल बीड जिल्ह्यामध्ये ५७ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आज मात्र पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. ८२० स्वॅब तपासण्यात आले त्यात ९५ रुग्ण हे पॉझिटिव्ह आले तर ७२५ रुग्ण हे निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाईतून ७, आष्टी ९, बीड ३८, गेवराई ९, केज १, माजलगाव ६, परळी १४, पाटोदा १, शिरूर ७ आणि वडवणीमध्ये ३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.

Most Popular

उद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच

बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...

अग्रलेख -निर्लज्जम्

एवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी? महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...

जिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...

धनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या

बीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...